शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा प्रदूषणाशी ‘गोकुळ’चा संबंध नाही

By admin | Updated: July 13, 2014 00:42 IST

दूध संघाचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांची माहिती

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) प्रकल्पाच्या शेजारील नाल्याचा पंचगंगेच्या नाल्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ‘गोकुळ’मुळे पंचगंगा प्रदूषित होत असल्याचे म्हणणे चुकीचे असल्याची माहिती संघाचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे. पंचगंगा प्रदूषणाबाबत ‘गोकुळ’सह इतर उद्योग बंद करण्याची नोटीस बजावली आहे, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सूर्यकांत डोके यांनी काल, शुक्रवारी न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे दिली होती. याबाबत ‘गोकुळ’च्या प्रशासनाने आज, शनिवारी आपली भूमिका मांडली. ‘गोकुळ’ प्रकल्प येथे राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांच्यामार्फत सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा १४ लाख लिटर प्रतिदिन क्षमतेचा प्रकल्प १९८५ पासून कार्यरत आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थ हाताळणीसाठी कोणतेही केमिकल वापरले जात नाही. सांडपाणी प्रकल्पामध्ये बॅक्टेरिया व मशिनरीद्वारे पाणी स्वच्छ केले जाते. हे पाणी परिसरातील बगीच्यासाठी वापरले जाते. त्याचबरोबर संघाने हे पाणी मागणीनुसार स्वखर्चाने शेतकऱ्यांना दिले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी ‘गोकुळ’ प्रकल्पास भेट देऊन मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार संघाने त्या त्या वेळेला त्वरित कार्यवाही करून प्रदूषण मंडळास वेळोवेळी उत्तर दिले असल्याचेही डी. व्ही. घाणेकर यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)