शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’, ‘केडीसीसी’ची उड्डाणे!

By admin | Updated: December 17, 2014 23:58 IST

संख्या घटली; सक्षमता आली!

सरत्या वर्षात ग्रामीण भागाची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा बॅँकेने विक्रमी २६०० कोटींचा टप्पा गाठत ‘नाबार्ड’च्या लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग मिळवला; तर ‘गोकुळ’ने उत्पादकांना भरघोस दूधदर फरक व दूध विक्रीत विक्रम करण्याची किमया केली. तसेच खासगी बॅँकांच्या आव्हानाला सक्षमपणे तोंड देण्याचे काम नागरी सहकारी बॅँकांनी केले आहे. एकंदरीत हे वर्ष सहकाराच्या दृष्टीने दिलासा देणारे ठरले आहे. सहकारातील घडामोडींचा थेट परिणाम सामान्य माणसावर होतो. जिल्हा बॅँकेने आर्थिक अरिष्टातून बाहेर पडून तब्बल २६०० कोटींच्या ठेवीचा टप्पा पूर्ण केला. त्याचबरोबर १२ वर्षे रखडलेल्या ५०० कर्मचाऱ्यांना बढत्या मिळाल्या. ‘नाबार्ड’ने जिल्हा बॅँकेला ‘अ’ वर्ग दर्जा देऊन चांगल्या कामाचे प्रशस्तिपत्र दिले. एकाच वर्षात ‘गोकुळ’ने दोनवेळा दूध दरवाढ करत ४५ कोटींचा फरक देऊन दूध व्यवसायाला बळकटी देण्याचे काम केले. मध्यंतरीच्या पडझडीनंतर जिल्ह्यात ४९ नागरी बॅँका कार्यरत आहेत. बॅँकिंग वाढविण्यासाठी केंद्र सरकारने खासगी बॅँका स्थापण्याचा सपाटा लावला आहे. त्यात राज्य शासनाचे बॅँकिंग निर्बंध पाहता नागरी बॅँकांनी मल्टीस्टेट मार्ग धरला आहे. खासगी बॅँकांच्या व्याजदरामुळे नागरी बॅँकांकडील कर्जदारांची संख्या कमी होत असून, बॅँकांचा सिडी रेशो सरासरी ५५ टक्क्यांपर्यंत आहे. दूध संस्थांची आर्थिक स्थिती चांगली आहे; पण व्याज सवलत योजनेमुळे विकास संस्था अडचणीत आल्या आहेत. यासाठीच गटसचिवांनी असहकार आंदोलन केले. साखर कारखानदारीच्या दृष्टीने सरते वर्ष ‘थोडी खुशी, थोडा गम’ असेच राहिले. ऊसदर नियामक मंडळाची स्थापना होऊन त्यामध्ये खासदार राजू शेट्टी व विक्रमसिंह घाटगे यांचा समावेश करण्यात आला. राज्य शासन व केंद्राच्या मदतीमुळे मागील गळीत हंगाम निसटला. या हंगामात ऊसदराचे आंदोलन नाही; पण केंद्राने मदत न केल्याने कारखानदार पेचात सापडले आहेत. याच वर्षात ‘भोगावती’, ‘बिद्री’च्या कारभाराची चौकशी सुरू झाली. दोन वर्षे प्रलंबित असलेल्या संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या. सहकार मंत्रिपद पहिल्यांदाच कोल्हापूरलाचंद्रकांतदादा पाटील यांच्या रूपाने सहकार, पणनचे कॅबिनेट मंत्रिपद पहिल्यांदाच कोल्हापूरला मिळाले, हे या वर्षाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले.संख्या घटली; सक्षमता आली!गेल्या चार-पाच वर्षांतील मरगळ झटकल्याने सहकारी बॅँकांनी खासगी बँकांना चांगली टक्कर दिली आहे. सहकारी बँकांची संख्या कमी आहे, पण त्यांच्यामध्ये सक्षमता आल्याचे मत बॅँकिंग तज्ज्ञ किरण कर्नाड यांनी व्यक्त केले. --राजाराम लोंढे