Kolhapur: ‘गोकुळ’ अध्यक्ष निवड: राजीनामा नव्हे; नवीन अध्यक्ष कोण, हेच महत्त्वाचे - अरुण डोंगळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 14:02 IST2025-05-19T14:00:51+5:302025-05-19T14:02:26+5:30
राज्यपातळीवरील नेते काय निर्णय घेतात ते बघूया

Kolhapur: ‘गोकुळ’ अध्यक्ष निवड: राजीनामा नव्हे; नवीन अध्यक्ष कोण, हेच महत्त्वाचे - अरुण डोंगळे
कोल्हापूर : माझा राजीनामा महत्त्वाचा नाही, ‘गोकुळ’ दूध संघाचा नवीन अध्यक्ष कोण? हेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे, राज्यपातळीवरील नेते काय निर्णय घेतात ते बघूया, अशी माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी रविवारी दिली.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितल्याशिवाय आपण राजीनामा देणार नसल्याचे अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितल्याने पेच निर्माण झाला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्यासह ‘गोकुळ’चे नेते उद्या, मंगळवारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
वाचा- लक्षात ठेवा मला मुश्रीफ म्हणतात, डोंगळेंना सुनावले
याबाबत, अध्यक्ष डोंगळे यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘जिल्ह्यातील मोठी माणसे भेटीसाठी जाणार असल्याचे समजले. भेट घेऊ देत, त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. येथे माझ्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा विषय महत्त्वाचा नाही. नवीन अध्यक्ष कोण करणार? हे महत्त्वाचे आहे. त्यांचे काही ठरले असेल तर ते दोन्ही नेत्यांना सांगतील.’