गोकुळमुळे जिल्हा परिषदेत शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:31 IST2021-04-30T04:31:00+5:302021-04-30T04:31:00+5:30

कोल्हापूर ‘गोकुळ’ ची रणधुमाळी रंगली असल्यामुळे जिल्हा परिषदेत शुकशुकाट पहावयास मिळत आहे. पदाधिकारी ...

Gokul caused a stir in the Zilla Parishad | गोकुळमुळे जिल्हा परिषदेत शुकशुकाट

गोकुळमुळे जिल्हा परिषदेत शुकशुकाट

कोल्हापूर ‘गोकुळ’ ची रणधुमाळी रंगली असल्यामुळे जिल्हा परिषदेत शुकशुकाट पहावयास मिळत आहे. पदाधिकारी आणि सदस्य सध्या आपापल्या नेत्यांच्या आदेशानुसार जोडण्या लावण्यात गर्क असल्याने सध्या जिल्हा परिषदेत अधिकारी आणि कर्मचारीच उपस्थित असल्याचे चित्र आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील गुरुवारी सकाळी काही काळ जिल्हा परिषदेत उपस्थित होते. मात्र उपाध्यक्ष सतीश पाटील हे गेले काही दिवस फिरकलेले नाहीत. पाटील हे विरोधी आघाडीतून उमेदवारीचे प्रमुख दावेदार होते. त्यामुळे गेले महिनाभर ते जिल्हा परिषदेत कमीच होते. त्यांनी गेल्या काही महिन्यापासून जोडण्या लावायला सुरूवात केली होती. परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नसली तरी त्यांनी नेते हसन मुश्रीफ यांच्या आदेशानुसार पूर्णवेळ ‘गोकुळ’साठी दिला आहे. पाटील यांचा गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यात संपर्क असल्यामुळे त्यांच्याकडे तेथील जबाबदारी आहे. बांधकाम सभापती हंबीरराव पाटील हे सत्तारूढ गटाच्या उमेदवार अनुराधा पाटील यांच्या प्रचारात आहेत. शिक्षण सभापती प्रवीण यादव यांचे नेते माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर हे विरोधी आघाडीतील उमेदवार असल्याने यादव यांनी त्यांच्या प्रचारासाठी पायाला भिंगरी बांधली आहे.

महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती डॉ. पदमाराणी पाटील यांच्यासह त्यांच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या सर्व सदस्य बुधवारी उपस्थित होत्या. त्यांची काल मासिक बैठकही झाली. मात्र त्यांचे पती राजेश पाटील हे देखील काही दिवस उपस्थित नसल्याने दालनातील गर्दी कमी झाली आहे. समाजकल्याण समितीच्या सभापती स्वाती सासने यांच पॉझिटिव्ह आल्यामुळे गेले काही दिवस त्या जिल्हा परिषदेकडे फिरकलेला नाहीत.

Web Title: Gokul caused a stir in the Zilla Parishad