शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

निष्ठावंतांना संधी देणार

By admin | Updated: May 11, 2015 01:06 IST

प्रकाश आवाडे : इचलकरंजी नगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले

इचलकरंजी : नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनतेशी नाळ जोडल्या गेलेल्या आणि कॉँग्रेस पक्षाशी प्रामाणिक व एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल. याची जाणीव ठेवून कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले. येथील शहर कॉँग्रेस समितीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या संचालकपदी निवड झालेले कॉँग्रेसचे उपाध्यक्ष विलास गाताडे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी आवाडे बोलत होते. ते म्हणाले, जिल्हा बॅँकेकडील उमेदवारी निवडीवेळी विविध घडामोडी घडल्या. त्यामध्ये आपणाला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला. प्रामाणिक कार्यकर्त्याला प्राधान्याने संधी देऊन चांगल्या कामाची सुरुवात करण्यात यावी, असा हेतू त्यामागे होता आणि त्यामुळेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून गाताडे यांना चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी सत्काराला उत्तर देताना विलास गाताडे म्हणाले, कॉँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकारण करीत असताना आपण नेहमीच समाजकारणाला व विधायक कामाला महत्त्व देऊ. यावेळी शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जिल्हा कॉँग्रेसचे उपाध्यक्ष प्रकाश सातपुते, कामगार नेते शामराव कुलकर्णी, नगरसेवक शशांक बावचकर, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मराठा मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वसंत मुळीक यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष रणजित जाधव, कॉँग्रेसचे गटनेते बाळासाहेब कलागते, युवा नेते राहुल आवाडे, माजी नगराध्यक्ष अशोक आरगे, अशोकराव सौंदत्तीकर, धोंडीलाल शिरगावे, प्रा. शेखर शहा, पंचायत समिती सदस्य राजेश पाटील, आदींसह कॉँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)