शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

पाचगावला पुरेसे पाणी देऊ

By admin | Updated: December 19, 2015 01:16 IST

आयुक्त : ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळास दिले आश्वासन

कोल्हापूर : शहरालगत असलेल्या पाचगाव तसेच उपनगर परिसराला पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात देण्याचा प्रयत्न केला जाईल. सध्या आठवड्यातून दोन दिवस पाणी देतोय, पुढील काळात तीन ते चार दिवस पाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी पाचगाव ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाला दिले. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली पाचगाव ग्रामपंचायत सदस्य भिकाजी गाडगीळ, जीतू पाटील, आदित्य शेटके, अर्जुन भिलुगडे, तानाजी बाबर, सुशांत गवळी, हिंदुराव पोवार, शैलेश पुणेकर, विकास नेसरीकर, लिंबाजी निर्मळ, सुजित चव्हाण यांच्यासह शिवसैनिकांनी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन पाचगाव व उपनगरांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला. तसेच एक लेखी निवेदनही त्यांना दिले. पाचगाव व उपनगरांतील भीषण पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्याकरिता पाचगाव ग्रामपंचायतीच्यावतीने १० लाख खर्चाच्या पाईपलाईन योजनेचा प्रस्ताव तयार केला असून गिरगाव येथील दोन्ही पाणी संस्थांकडून पाणी उपसा करून ते पाणी पाचगावच्या टाकीत सोडायचे व तेथून पाचगाव, उपनगरांना देण्याचे नियोजन आहे. हा प्रस्ताव जिल्हाधिकारी स्तरावर प्रलंबित आहे. त्याचा पाठपुरावा महानगरपालिकेमार्फत करण्यात यावा, अशी सूचना यावेळी केली. पाचगावमधील काही उपनगरांना पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु काही महिन्यांपूर्वी रायगड कॉलनी येथील पाणी व्हॉल्व्ह बंद केल्यामुळे पाणीटंचाई तीव्र झाली आहे. काही लोकप्रतिनिधींनी सूडबुद्धीने अधिकाऱ्यांना धमकावून पाणीपुरवठा करणारे व्हॉल्व्ह बंद केल्याची आमची शंका आहे, असे शिष्टमंडळातील काहीजणांनी आयुक्तांना सांगितले. सध्या पाण्याचे टँकर रायगड कॉलनी परिसरात जास्त फिरतात, ते पुढे पाचगावपर्यंत द्यावेत, अशी सूचना यावेळी करण्यात आली. शिवसेना पाचगाव परिसरातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटेपर्यंत तीव्र लढा उभारेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी मनपा उपायुक्त विजय खोराटे, जलअभियंता मनीष पवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)