शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज शहरातील विकासकामांना २५ कोटी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST

मुंबई येथे मंत्री शिंदे यांची समक्ष भेट घेऊन खासदार मंडलिक आणि गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी हे निवेदन ...

मुंबई येथे मंत्री शिंदे यांची समक्ष भेट घेऊन खासदार मंडलिक आणि गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी हे निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, मुरगुडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, गडहिंग्लजचे नगरसेवक नरेंद्र भद्रापूर, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, विनोद बिलावर उपस्थित होते. पत्रात म्हटले आहे, गडहिंग्लज शहराची लोकसंख्या ३२ हजार ६२२ इतकी आहे. परंतु, नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे मूळ शहरासह हद्दवाढीमुळे शहरात समाविष्ट झालेल्या क्षेत्रात मूलभूत नागरी सुविधा पुरविण्यासाठी नगरपालिकेला मर्यादा पडत आहेत. त्यामुळे गडहिंग्लज पालिकेला भरीव निधी द्यावा आणि वाढीव कर्मचाऱ्यांच्या नव्या आकृतिबंधाला मंजुरी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

प्रस्तावित कामे व मागितलेला निधी कंसात असा :

- रस्ते व गटारी बांधकाम : १ कोटी

- जुना शिवाजी चौक परिसर सुशोभीकरण : २० लाख

- वॉटर एटीएम बसविणे : ३० लाख

- पालिका कर्मचारी निवास बांधकाम : दोन कोटी ६५ लाख

- लाखेनगर नाला बांधकाम : दोन कोटी

- सांस्कृतिक केंद्र व वाचनालय : १२ कोटी

- ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती : एक कोटी ३५ लाख.

- रस्ते सुरक्षेसाठी : ३० लाख

- घनकचरा व्यवस्थापन : ५७ लाख

- स्वच्छ भारत अभियानातील बक्षिसाचा दुसरा हप्ता : तीन कोटी ७५ लाख

- वैशिष्ट्यपूर्ण कामाचे विशेष अनुदान : पाच कोटी

फोटो ओळी : मुंबई येथे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना खासदार संजय मंडलिक व नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी पत्र दिले. यावेळी ए. वाय. पाटील, राजेखान जमादार, नरेंद्र भद्रापूर, नागेंद्र मुतकेकर, विनोद बिलावर उपस्थित होते.

क्रमांक : २२०९२०२१-गड-०७