मुंबई, पुण्याचे उपमहापौरपद द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:20 IST2020-12-09T04:20:55+5:302020-12-09T04:20:55+5:30
आठवले यांची चंदरकांत पाटील यांच्याकडे मागणी लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : निवडणुका जाहीर होण्याआधीच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास ...

मुंबई, पुण्याचे उपमहापौरपद द्या
आठवले यांची चंदरकांत पाटील यांच्याकडे मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : निवडणुका जाहीर होण्याआधीच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन मुंबई आणि पुणे या महापालिकांच्या उपमहापौरपदाची मागणी केली.
जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या आठवले यांनी मंगळवारी दुपारी आमदार पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये काही वेळ बंद दाराआड चर्चा झाली. यानंतर पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले, येणाऱ्या वर्षभरामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूरसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. यामध्ये रिपब्लिकनच्या आठवले गटाला योग्य जागा मिळाल्या पाहिजेत. तसेच मुंबई, पुण्याचे उपमहापौरपदही आमच्या पक्षाला मिळायला हवे, अशी मागणी पाटील यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.