शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची माहिती १०९८ वर द्या : जिल्हाधिकारी दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 18:04 IST

CoronaVirus Kolhapur : कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या बालकांची माहिती रुग्णालयांनी तसेच नातेवाईकांनी १०९८ वर द्यावी, कोणालाही स्वत:च्या अधिकारात या बालकांना दत्तक किंवा अन्य कोणाकडे सांभाळ करण्यासाठी देता येणार नाही. बालकल्याण समितीमार्फतच बालकांचा निर्णय घेतला जावा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिल्या.

ठळक मुद्देकोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची माहिती १०९८ वर द्या : जिल्हाधिकारी दौलत देसाई रुग्णालये, नातेवाईकांना आवाहन, परस्पर ताबा घेता येणार नाही

कोल्हापूर : कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या बालकांची माहिती रुग्णालयांनी तसेच नातेवाईकांनी १०९८ वर द्यावी, कोणालाही स्वत:च्या अधिकारात या बालकांना दत्तक किंवा अन्य कोणाकडे सांभाळ करण्यासाठी देता येणार नाही. बालकल्याण समितीमार्फतच बालकांचा निर्णय घेतला जावा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिल्या.सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू असून, एकाच कुटुंबातील पती, पत्नीचे निधन होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांच्या लहान मुलांच्या वाट्याला अनाथपण येत आहे. या अनाथ झालेल्या मुलांना परस्पर दत्तक देण्यासारखे मेसेजेस व्हायरल होत आहेत. शिवाय त्यांची तस्करी, अवैध कारणांसाठी वापर होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे.

यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्याच अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सुजाता शिंदे, बालसंरक्षण अधिकारी सागर दाते, आशिष पुंडपळ, संजय चौगुले, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे उपस्थित होते. दूरदृष्यप्रणालीद्वारे आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव पंकज देशपांडे, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा वैशाली बुटाले यांनी सहभाग घेतला.यावेळी शहर व जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये व कोविड सेंटरमध्ये अनाथ झालेल्या बालकांची माहिती १०९८ वर द्या, असे सांगणारे फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला. माहिती देण्याची जबाबदारी रुग्णालयांची, वैद्यकीय अधिकारी व कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची असणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर