शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

Girnar Parikrama: गिरनारची जंगल पायी परिक्रमा रद्द; भाविकांचा हिरमोड, महाराष्ट्रातून हजारो भाविक होतात सहभागी

By विश्वास पाटील | Updated: November 4, 2025 12:07 IST

गेल्या काही वर्षांत प्रथमच ही यात्रा रद्द झाली आहे.

विश्वास पाटीलकोल्हापूर : प्रचंड पावसामुळे गुजरातमधील गिरनार परिक्रमा मार्गांवरील रस्ते वाहून गेले आहेत, तर सर्वत्र चिखल झाला आहे. त्यामुळे देवस्थान समिती व स्थानिक प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षितेसाठी ही परिक्रमा रविवारी रद्द केली असून, प्रतीकात्मक परिक्रमा करण्याचे आवाहन केले आहे. पावसाचा फटका देवाच्या भक्तीलाही बसला आहे. ही जंगलातून पायी जाण्याची परिक्रमा फक्त प्रतिवर्षी नोव्हेंबरमध्येच असते. ती कार्तिक एकादशीपासून सुरू होते. त्यासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांचा परिक्रमा अचानक रद्द झाल्याने हिरमोड झाला. कोल्हापुरातूनही अनेक भाविक या परिक्रमेसाठी गेले आहेत. गेल्या काही वर्षांत प्रथमच ही यात्रा रद्द झाली आहे.पंढरपूरला वारीसाठी प्रत्येक एकादशीला पांडुरंगाचे भक्त जातात, तसे या परिक्रमेलाही जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यासाठी दोन मार्ग आहेत. पायी दहा हजार पायऱ्या चढून एका मार्गाने भाविक नियमित जातात आणि जंगलातून पायी चालत जाणारी परिक्रमा फक्त कार्तिक शुक्ल एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत सात दिवसच सुरू असते. ही परिक्रमा अंदाजे ३६ किलोमीटर लांब आहे. ही परिक्रमा भवनाथ मंदिरापासून सुरू होते, जी सुंदर जंगल आणि विविध मंदिरांमधून जाते आणि दत्तप्रभूंच्या आशीर्वादाने पूर्ण होते. त्यामध्ये महाराष्ट्रातून हजारो भाविक सहभागी होतात. गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यात असलेले हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. ज्यांना भक्तीसोबत ट्रेकिंग करायचे असते ते लोक या परिक्रमेला प्राधान्य देतात.पावित्र्य काय..?गिरनार पर्वताला दत्तप्रभूंचे अक्षय निवासस्थान मानले जाते, त्यामुळे या परिक्रमेला विशेष धार्मिक महत्त्व आहे.

गिरनार परिक्रमेची दत्तभक्तांना वर्षातून एकदाच संधी असते. त्यासाठी वर्षभर तयारी केलेली असते. पण यावर्षी या तयारीवर निसर्गाने विरजण घातले आहे. या ठिकाणी देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक आले आहेत. भाविकांना जड अंतकरणाने पुढच्या वर्षी येण्याचा मनोमनी संकल्प करून शिखर दर्शन करून परत जावे लागत आहे. - मोहन खोत, हुपरी, ता. हातकणंगलेकोल्हापूरसह नृसिंहवाडी व पश्चिम महाराष्ट्रातून या परिक्रमेसाठी जाणाऱ्या दत्तभक्तांची संख्या मोठी आहे. परंतु परिक्रमा रद्द झाल्याने हे सर्व भाविक अन्य धार्मिक स्थळांना भेटी देऊन परतू लागले आहेत. - अनिल चव्हाण, कोल्हापूर

English
हिंदी सारांश
Web Title : Girnar Parikrama Cancelled Due to Rain; Devotees Disappointed.

Web Summary : Due to heavy rains and impassable routes, the Girnar Parikrama in Gujarat has been cancelled for devotees' safety. The annual pilgrimage, usually in November, attracts thousands from Maharashtra. Devotees are urged to perform a symbolic circumambulation instead.