कोल्हापूर : घुणकी (ता. हातकणंगले) येथून मंगळवार (दि. २६) पासून पंचवीस वर्षांची तरुणी बेपत्ता झाली आहे. वर्षाराणी संपत माजगावकर असे तिचे नाव आहे. तिचा साखरपुडा २८ तारखेला होता. त्याचे निमंत्रण देण्यासाठी मैत्रिणींकडे जाते, असे घरी सांगून ती गेली. परंतु रात्री उशीर झाला तरी ती परत आली नाही, म्हणून नातेवाईकांनी शोध घेतला. परंतु ती मिळून आली नाही. तिच्याकडील मोबाईलही स्वीचऑफ आहे. पालकांनी पैपाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडे शोध घेतला व शेवटी पोलिसांत तक्रार दिली.
वर्षाराणी अंगाने मध्यम, उंची साडेपाच फूट, रंगाने काळीसावळी, चेहरा गोल, डोळे काळे, नाक पसरट, अंगामध्ये निळ्या रंगाचा टाॅप, काळ्या रंगाची लेगिन्स असे तिचे वर्णन आहे. पेठवडगाव पोलीस ठाण्यात तिचे वडील संपत विलास माजगावकर (वय ४९, रा. घुणकी, ता. हातकणंगले) यांनी मुलगी बेपत्ताची तक्रार दिली आहे. पोलीस हवालदार जी. के. घोडके तपास करीत आहेत.
फोटो : २८०१२०२१-कोल-वर्षाराणी माजगांवकर (बेपत्ता)