शिवा काशिद समाधी विकासासाठी निधी मिळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:20 IST2021-01-14T04:20:33+5:302021-01-14T04:20:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पन्हाळ्यातील वीर शिवा काशिद समाधीच्या विकास कामांसाठी आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी ...

Get funds for Shiva Kashid Samadhi development | शिवा काशिद समाधी विकासासाठी निधी मिळावा

शिवा काशिद समाधी विकासासाठी निधी मिळावा

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पन्हाळ्यातील वीर शिवा काशिद समाधीच्या विकास कामांसाठी आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी आमदार निधीतून प्रत्येकी २५ लाख रुपये समाजासाठी दिले आहेत. हा निधी विकासकामांसाठी मिळावा यासाठी नाभिक समाजाच्या वतीने बुधवारी जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांना मागणीपत्र दिले.

आमदार पडळकर व सदाभाऊ खोत यांनी वीर शिवा काशिद समाधी परिसरात नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष सयाजी झुंजार व समाजाच्या शिष्टमंडळाकडे निधीचे पत्र सुपुर्द केले. नंतर लागणारा २ कोटींचा निधीही उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करू, असे सांगितले. बुधवारी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना हे पत्र देण्यात आले. यावेळी एम. आर. टिपुगडे, मारुती टिपुगडे, नारायण पोवार, सोमनाथ साळुंखे, बाबासाहेब काशिद, विजय संकपाळ, संतोष चव्हाण, विश्वास गंगाधर व पदाधिकारी उपस्थित होते.

--

फोटो नं १३०१२०२१-कोल-शिवा काशीद फंड

नाभिक समाजाच्या वतीने बुधवारी जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांना वीर शिवा काशिद समाधी परिसर विकासासाठी निधी मिळावा या मागणीचे पत्र देण्यात आले.

--

Web Title: Get funds for Shiva Kashid Samadhi development