कामगारांप्रती गणपतराव पाटील यांची भूमिका कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:22 IST2021-03-14T04:22:15+5:302021-03-14T04:22:15+5:30

शिरोळ : कामगार कर्मचारी संघर्ष युनियन ही कामगारांच्या जीवनात बदल घडवून चैतन्य आणण्याचे काम करीत आहे. कामगारांच्या योजना प्रत्येक ...

Ganapatrao Patil's role towards the workers is commendable | कामगारांप्रती गणपतराव पाटील यांची भूमिका कौतुकास्पद

कामगारांप्रती गणपतराव पाटील यांची भूमिका कौतुकास्पद

शिरोळ : कामगार कर्मचारी संघर्ष युनियन ही कामगारांच्या जीवनात बदल घडवून चैतन्य आणण्याचे काम करीत आहे. कामगारांच्या योजना प्रत्येक घरापर्यंत नेऊन कामगारांना कुटुंबातील सदस्य समजून त्यांचे प्रश्न मार्गी लावणार आहे. श्री दत्त उद्योग समूहातील कामगारांप्रती उद्यानपंडित गणपतराव पाटील यांची भूमिका कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन कामगार कर्मचारी संघर्ष युनियनचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील यांनी केले.

श्री दत्त कारखाना कार्यस्थळावरील सभागृहात तालुक्यातील कामगार कर्मचारी संघर्ष युनियनच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. यावेळी ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, सर्जेराव शिंदे, अशोक कोळेकर, शेखर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी गणपतराव पाटील म्हणाले, कामगार कर्मचारी संघर्ष युनियन ही संघटना सर्वच कामगारांसाठी अतिशय चांगले काम करीत आहे. आगामी काळात श्री दत्त उद्योग समूह आणि कामगार युनियन हे नेहमीच एकमेकांशी सुसंवाद साधत एकमेकांच्या सहकार्याने काम करत राहतील. युनियनच्या मागे दत्त उद्योग समूह सर्व ताकदीनिशी उभा राहील.

स्वागत सतीश मोटे, तर राजू मुजावर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कामगार संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नितीन बागे यांनी आभार मानले.

फोटो - १३०३२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ -

शिरोळ येथे कामगार कर्मचारी संघर्ष युनियनचा मेळावा झाला. यावेळी गणपतराव पाटील, संजय पाटील यांच्यासह कामगारवर्ग उपस्थित होता.

Web Title: Ganapatrao Patil's role towards the workers is commendable