शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गगनबावडा तालुक्यात निर्मल ग्रामचा बोजवारा

By admin | Updated: August 20, 2015 23:20 IST

खर्चाचा हिशेबही लागेना : बक्षीस मिळेपर्यंत स्वच्छता... आता येरे माझ्या मागल्या

चंद्रकांत पाटील - गगनबावडागावात प्रवेश करताना आत नाक धरून जावे लागत आहे. निर्मल ग्राम बक्षिसांच्या खर्चाचा हिशेबही लागेना, अशी स्थिती गगनबावडा तालुक्याची झाली आहे. एकूणच बक्षीस मिळेपर्यंत सर्वत्र स्वच्छता होती. त्यानंतर सर्वत्र घाणच घाण, अशी काहीशी निर्मल ग्रामची अवस्था झाली आहे.संपूर्ण स्वच्छता अभियान कार्यक्रम कोल्हापूर जिल्ह्याबरोबर गगनबावडा तालुक्यात मोठा गाजावाजा करीत राबविण्यात आला. संपूर्ण निर्मल ग्राम होण्याचा राज्यातील पहिला मान पन्हाळा तालुक्यापाठोपाठ गगनबावडा तालुक्याला मिळाला. त्याचे सर्वत्र कौतुकही झाले; पण वस्तुस्थिती वेगळी होती. हा कार्यक्रम जनतेच्या सहभागातून राबवून गावे हागणदारीमुक्त करावयाची होती; पण त्यासाठी जनतेच्या मताचा विचार झालाच नाही, तर पोलीस खात्याने लोकांना पहाटे घराबाहेर पडणेही अशक्य केले. शौचालये बांधण्यासाठी सक्ती करण्याचे प्रकार घडले. शौचालये बांधली नाहीत म्हणून अनेक गोरगरिबांचे रेशनचे धान्य बंद करण्यात आले. एवढे करूनही शौचालये बांधणे अशक्य असलेल्या गोरगरिबांना तात्पुरती शौचालये उभारण्यास भाग पाडले. निर्मल ग्राम तपासणीसाठी येणार म्हटल्यावर शाळेतील मुलांना रस्ते चकाचक करण्याची सक्ती केली. गटारे स्वच्छ करावी लागली. महिलांनी रांगोळी घालून समितीचे स्वागत केले. समिती या स्वागताने भारावून गेली. निर्मल ग्रामचे चांगले काम झाले असले, तरी अनेक गावांत कागदोपत्री सर्व शौचालये झाल्याची नोंद झाली; पण आज अनेक गावांची स्थिती पाहिल्यास ही गावे निर्मल ग्राम आहेत. यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, अशी स्थिती आहे.तात्पुरती शौचालये बंद झाली आणि लोक आजही पुन्हा रस्त्यावर घाण करीत आहेत. गावागावांत पूर्वीसारखेच साथीचे रोग थैमान घालू लागले आहेत. निर्मल ग्रामचे बक्षीस घेतले; पण गावातील ही अस्वच्छता पाहिली, तर हा निधी गेला कुठे, अशीही उघड चर्चा होत आहे.योजना कागदोपत्रीच...