शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

गगनबावडा ‘डी. वाय.’ची २९०० रुपये पहिली उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:56 IST

गगनबावडा : येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगामात गळितास येणाऱ्या उसाला पहिली ...

गगनबावडा : येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगामात गळितास येणाऱ्या उसाला पहिली उचल प्रतिटन २९०० रुपये देणार असून, हंगाम समाप्‍तीनंतर ५० रुपयांचा दुसरा हप्‍ताही देणार असल्‍याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष व पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, चालू गळीत हंगामाची एफ.आर.पी. प्रती मे. टन ३४७९.८५ रुपये असून, त्‍यातून ऊस तोडणी-वाहतूक खर्च ६५७.८३ रुपये वजा जाता कारखान्याची निव्‍वळ एफ. आर. पी. प्रतिटन २८२२ रुपये इतकी होत आहे. परंतु कारखान्‍याने चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसास एफ.आर.पी.पेक्षा १२८ रुपये जादा उचल देऊन प्रतिटन २९५० रुपये देण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यापैकी पहिल्‍या उचलीपोटी एकरकमी २९०० रुपये देणार असून, हंगाम समाप्‍तीनंतर ५० रुपयांचा दुसरा हप्‍ता आदा केला जाणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उसापोटी जास्तीत जास्त दर देता यावा याकरिता कारखान्याचे संचालक मंडळ नेहमीच प्रयत्नशील आहे.

चालू गळीत हंगामात १५ नोव्‍हेंबरअखेर गाळप केलेल्‍या ७६ हजार २१३ मे. टनांची पहिली उचल २९०० रुपयांप्रमाणे २२ कोटी १० लाख १८ हजार रुपये गुरुवारी (दि. ३) संबंधित शेतकऱ्यांच्‍या बँक खात्‍यावर वर्ग केले आहेत. शेतकऱ्यांनी संबंधित शाखेशी संपर्क साधावा.

कारखान्‍याने चालू गळीत हंगामात ३० नोव्‍हेंबरअखेर एक लाख ३१ हजार ५३० मे. टन उसाचे गाळप करून एक लाख ३५ हजार ६५० क्विंटल साखर पोत्‍यांचे उत्‍पादन केलेले आहे. कारखान्याने ठरविलेले ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकविलेला संपूर्ण ऊस गाळपास पाठवून देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी कारखान्‍याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सेक्रेटरी नंदू पाटील व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.