शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज विभाग दुष्काळी जाहीर करा

By admin | Updated: August 22, 2015 01:00 IST

संध्यादेवी कुपेकर : मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांना पत्र; गडहिंग्लजमध्ये आढावा बैठक

गडहिंग्लज : गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तीनही तालुक्यांत यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे खरिपाची सर्व पिके धोक्यात आली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत भागातील सर्व धरण व तलावांतील पाणीसाठाही कमी झाला आहे. गडहिंग्लजच्या पूर्वभागात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संपूर्ण गडहिंग्लज विभागात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. येथील विश्रामगृहात शुक्रवारी दुपारी पाटबंधारे व कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी गडहिंग्लज उपविभागातील सद्य:स्थितीतील पीक-पाण्याचा आढावा घेतला. त्यानंतर त्या पत्रकाराशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, येत्या ८-१५ दिवसांत पाऊस न पडल्यास परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. त्यामुळे आपण मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून गडहिंग्लज विभागात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणार आहे. गडहिंग्लज तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी २०० मि.मी. कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे सोयाबीन, भात, भुईमूग, ऊस व बटाटा पिकांमध्ये प्रचंड घट होणार आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. पर्जन्यमान कमी आणि पिकांवर कीडरोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून, यामुळे खरिपाचा हंगाम वाया जाण्याची भीती आहे. हिरण्यकेशी, घटप्रभा आणि ताम्रपर्णी नद्यांच्या पातळीतही घट झाली आहे. शेतकऱ्यांची वीज बिले माफ करावीत, हलकर्णी भागातील शेतकऱ्यांना सर्व पिकांची नुकसानभरपाई द्यावी, पीक कर्ज माफ व शेतसारा माफ करावा, जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करावी, जनतेला रोजगार द्यावा, धरणे व तलावातील पाणी जनावरे व माणसाकरिता पिण्यासाठी राखून ठेवावे, हलकर्णी परिसरात जलयुक्त शिवार योजनेची कामे प्राधान्याने घ्यावीत, अशी मागणी आपण शासनाकडून करणार आहोत, असेही कुपेकर यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष बी. एन. पाटील, उपसभापती तानाजी कांबळे, जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील, ‘गोकुळ’चे संचालक रामराजे कुपेकर, जि. प. सदस्य जयकुमार मुन्नोळी, जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष उदयराव जोशी, जयसिंग चव्हाण, अमर चव्हाण, इकबाल काझी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)