शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद
2
पुश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
3
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
4
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
5
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
6
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
7
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
8
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
9
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
10
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
11
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
12
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
13
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
14
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
15
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
16
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
17
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
18
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
19
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
20
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजमध्ये प्रांत कार्यालयाच्या दारातच मांडल्या चुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:25 IST

गडहिंग्लज : गॅस, पेट्रोल व डिझेल या इंधन दरवाढीच्या विरोधात गडहिंग्लज प्रांत कचेरीसमोर महिला कृती समितीतर्फे जोरदार निदर्शने करण्यात ...

गडहिंग्लज : गॅस, पेट्रोल व डिझेल या इंधन दरवाढीच्या विरोधात गडहिंग्लज प्रांत कचेरीसमोर महिला कृती समितीतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. महिला दिनीदिवशीच महिलांनी गॅस दरवाढ कमी करण्यासाठी चूल मांडून प्रांत कार्यालयाच्या दारात अन्न शिजवून आणि शंखध्वनी करून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला.

शहरातील लक्ष्मी मंदिर ते प्रांतकचेरी अशी निषेध फेरी काढण्यात आली. प्रांत कार्यालयाजवळ गॅस सिलिंडरच्या टाकीभोवती रांगोळी काढून पूजन करण्यात आले. शासनाने इंधन दरवाढ तत्काळ कमी करावी यासाठी शासनाच्या विरोधात महिलांनी शंखध्वनी केला. पंतप्रधान मोदींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

महागाई आणि दरवाढीमुळे मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य महिलांचे हाल सांगणारे आणि शासनाच्या चुकीच्या धोरणांचा गोरगरीब जनतेला बसलेला फटका याविषयीचे गीत महिलांनी सादर केले. कॉ. उज्ज्वला दळवी, 'दानिविप'चे रमजान अत्तार यांची भाषणे झाली.

प्रांतांना दिलेल्या निवेदनात, लॉकडाऊन काळातील वीज बिलात सवलत द्यावी, इंधन दरवाढ कमी करावी, रेशनकार्ड रद्द करण्याची मोहीम मागे घ्यावी, जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करावेत, आदी मागण्यांचा समावेश आहे.

आंदोलनात माजी नगरसेविका अरुणा शिंदे, रूपाली परीट, अलका भोईटे, गीतांजली पालकर, ऊर्मिला कदम, वसुंधरा सावंत, शारदा अजळकर, सुमन सावंत, सुशीला पाटील, नूरजहाँ पेंढारी, सुवर्णलता गोईलकर, साधना पोवार, सविता चव्हाण, अनिता जगताप, आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या.

------------------------

फोटो ओळी : गडहिंग्लज येथे इंधन दरवाढीच्या निषेधार्थ महिला कृती समितीतर्फे प्रांत कचेरीसमोर शंखध्वनी करून शासनाचा निषेध केला. यावेळी कॉ. उज्ज्वला दळवी, अरुणा शिंदे, अलका भोईटे, गीतांजली पालकर, आदींसह महिला उपस्थित होत्या. (मज्जीद किल्लेदार)

क्रमांक : ०८०३२०२१-गड-०३