शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

गावतलावाच्या संवर्धनासाठीही आता निधी

By admin | Updated: March 9, 2017 00:08 IST

‘लोकमत’ने मांडला होता विषय : पाण्याच्या नैसर्गिक साठ्यांचे जतन होणार

समीर देशपांडे --कोल्हापूर---गावागावांतील तलावांच्या संवर्धनासाठी आता महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या जनसुविधा योजनेतून निधी उपलब्ध होणार आहे. दारात नळाचे पाणी आल्यापासून गावतलावांकडे ग्रामस्थांचे आणि शासनाचेही दुर्लक्ष होत आहे आणि त्यासाठीही निधीही उपलब्ध होत नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ने ९ डिसेंबर २०१६ च्या अंकामध्ये मांडले होते. जनसुविधा योजना ही २०१० पासून सुरू करण्यात आली होती. या योजनेतून ग्रामपंचायतींच्या कार्यालयांसाठी आणि स्मशानभूमीतील सुधारणांसाठी निधी उपलब्ध करून दिला जात होता. या दोनच बाबींवर खर्च करावयाचा असल्याने एकीकडे ही दोन कामे वेगाने होत असताना अन्य बाबींवर खर्च करण्यावर नियमांमुळे मर्यादा येत होत्या. आता ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायत कार्यालये, स्मशानभूमी सुधारणा याबरोबरच ग्रामपंचायत हद्दीत आठवडी बाजार केंद्र विकसित करणे, अस्तित्वात असलेल्या विहिरींवर सौरऊर्जेवर आधारित दुहेरी हातपंप बसविणे, जलशुद्धिकरण आर. ओ. प्लँटची व्यवस्था करणे, गावतलावातील गाळ काढून गावतलावाचे सुशोभीकरण करणे, घनकचरा व्यवस्था करणे व भूमिगत गटारे बांधणे या कामांचाही समावेश करण्यात येणार आहे. शासनाने या कामांचा समावेश करून पाणी सुविधांना प्राधान्य दिले असून, घनकचरा आणि सांडपाणी निर्गतीलाही महत्त्व दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रतिवर्षी सुमारे सात कोटी रुपयांचा निधी या योजनेतून उपलब्ध होतो. त्यातून अनेक ग्रामपंचायतींची कार्यालये बांधण्यात आली असून, गेल्या सहा वर्षांत जिल्ह्यातील बहुतांशी स्मशानभूमींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच स्मशानशेड उभारणी आणि स्मशानभूमीतील सुधारणांना प्राधान्य देण्यात आले आहे. आतातर या कामांचाही समावेश करण्यात आल्याने गावागावांत आणखी वैविध्यपूर्ण कामे करणे शक्य होणार आहे. गावोगावी तलावांना चांगले दिवसथेट नळाद्वारे पाणी मिळू लागल्याने ग्रामपंचायतींपासून ते ग्रामस्थांपर्यंत सर्वांनीच गावतळी दुर्लक्षित केली. त्यामध्ये गाळ साचू लागला. पाण्याचा वापर थांबला, तळी मुजू लागली; परंतु गावाजवळच असलेल्या या नैसर्गिक पाणीसाठ्यांचे जतन होण्याची गरज ‘लोकमत’ने मांडली होती. शासनाने त्यासाठी निधी लावण्याचीही गरज मांडली होती. आता ही कामे घेता येणार असल्याने गावोगावच्या तलावांना चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. तालुकावार गावतलाव व विहिरीतालुक्याचे गावतलावसार्वजनिक वापरातील नावविहिरीविहिरीआजरा३२८९७३भुदरगड२0३७३७चंदगड८५१३३१११गगनबावडा0९१६१६गडहिंग्लज४११0३५९हातकणंगले३५८४७२करवीर६९१0८९0कागल३७८३६१पन्हाळा४४१६३१२१राधानगरी१९७३४४शाहूवाडी३८८४६९शिरोळ२१ १३१२एकूण४५३९८६७६५ग्रामपंचायतींना सुधारित शवदाहिनींचा पुरवठावर्षमंजूर निधीपुरविलेल्या शवदाहिनींची संख्या२०१०/११६६ लाख१२५२०१२/१३१ कोटी २९ लाख२५०२०१४/१५१ कोटी१७९२०१६/१७५० लाख८८ नग (प्रस्तावित)स्मशान शेड बांधणे वर्षस्मशान शेड बांधणे/ सुधारणा करणे मंजूर कामे२०१२/१३२२५२०१३/१४२०६२०१४/१५१८६२०१५/१६२२७२०१६/१७१०५