रुद्रभूमीसाठी निधी कमी पडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:22 IST2021-03-14T04:22:26+5:302021-03-14T04:22:26+5:30

कोल्हापूर : वीरशैव लिंगायत समाजातर्फे सुुरू असलेल्या रुद्रभूमी (स्मशानभूमी) परिसर विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्य ...

Funding for Rudrabhumi will not be reduced | रुद्रभूमीसाठी निधी कमी पडणार नाही

रुद्रभूमीसाठी निधी कमी पडणार नाही

कोल्हापूर : वीरशैव लिंगायत समाजातर्फे सुुरू असलेल्या रुद्रभूमी (स्मशानभूमी) परिसर विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

राज्य नियोजन मंडळाच्या फेररचनेत पुन्हा एकदा माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा समाजातर्फे सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी सुनील गाताडे होते. यावेळी क्षीरसागर यांनी राज्य नियोजन मंडळाकडून निधीची तरतूद करून रुद्रभूमीचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.

यावेळी संचालक नानासाहेब नष्टे, सुहास भेंडे, राजू वाली, ॲड. सतीश खोतलांडे, राजेश पाटील, वसंतराव सांगवडेकर, बी. एस. पाटील उपस्थित होते.

---

फोटो नं १३०३२०२१-कोल-राजेश क्षीरसागर

ओळ : राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

--

Web Title: Funding for Rudrabhumi will not be reduced