शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजच्या भुयारी वीज वाहिन्यांसाठी निधी द्या

By admin | Updated: May 28, 2015 00:58 IST

नगराध्यक्षांचे ऊर्जामंत्र्यांना निवेदन : सार्वजनिक सुरक्षिततेसाठी प्रमुख चार मार्गांवर भुयारी वीजवाहिन्यांची गरज

गडहिंग्लज : सार्वजनिक सुरक्षिततेसाठी गडहिंग्लज शहरातील प्रमुख चार मार्गांवर भुयारी वीजवाहिन्या टाकण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून निधी मिळावा, अशी मागणी नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांनी ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. ऊर्जामंत्री बावनकुळे दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. नगराध्यक्षा घुगरे यांनी ऊर्जा खात्याशी संबंधित अडी-अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. त्यावेळी मंत्र्यांनी गडहिंग्लज पालिकेस सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली.निवेदनात म्हटले आहे, गडहिंग्लज शहरात संकेश्वर रोड, आजरा रोड, कडगाव रोड व भडगाव रोड हे चार प्रमुख मार्ग आहेत. गडहिंग्लज परिसरात ७ साखर कारखाने आहेत. त्याशिवाय बाहेरील अन्य कारखान्यांनाही येथील ऊस जातो. त्यामुळे मुख्य मार्गावर ऊस वाहतूक व इतर अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. मुख्य मार्गावरील रस्त्यालगतचे खांब रस्ता रूंदीकरणासाठी अडथळ्यांचे व धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे अपघाताच्या काही घटनाही घडल्या आहेत. त्यासाठी धोकादायक खांब अन्यत्र हलविणे आणि भुयारी विद्युत वाहिनी टाकण्याची गरज आहे.वाढत्या विस्तारामुळे शहरात अनेक वसाहती निर्माण झाल्या आहेत. त्यांना वीजपुरवठा करण्यासाठी पथदिवे व वीजवाहिन्यांचा खर्च आजअखेर पालिकेनेच केला आहे. मात्र, उत्पन्न व गरजा लक्षात घेता हा खर्च पालिकेला झेपेनासा झाला आहे. त्यामुळे यापुढे नवे विद्युत खांबासाठीचा खर्च महावितरण कंपनीने करावा.शहराच्या नळपाणी योजनेसाठी बसविण्यात आलेले वीजपंप, बगीच्यांना पाणी देण्यासाठी वापरले जाणारे पंप आणि सांडपाणी उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या पंपासाठीची वीजबिल आकारणी कमर्शियल व औद्योगिक पद्धतीने केली जाते. त्याचा पालिकेवर मोठा बोजा पडत आहे. त्यासाठी त्याची आकारणी सवलतीच्या दराने करण्यात यावी, अशी मागणीही नगराध्यक्षांनी निवेदनातून केली आहे.यावेळी युवराज बरगे, विद्युत निरीक्षक सूरज कुंभार उपस्थित होते. (प्रतिनिधी)