शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळ ठरावधारकांनी सुचविलेल्या विकासकामांनाही निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:22 IST

कोल्हापूर गोकुळमधील ठरावधारकांनी मागणी केल्यास त्यांच्या गावातील विकासकामांसाठी निधी देणार असल्याची घोषणा ...

कोल्हापूर गोकुळमधील ठरावधारकांनी मागणी केल्यास त्यांच्या गावातील विकासकामांसाठी निधी देणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. मुश्रीफ यांची ही घोषणा म्हणजे विरोधी शाहू आघाडीला बळ असल्याचे मानले जाते.

जिल्हा परिषदेच्या सदस्यांना जसा निधी दिला तसे गोकुळ ठरावधारकांना काही पॅकेज आहे का, अशी विचारणा केली असता मुश्रीफ म्हणाले, गाेकुळचा ठरावधारक हा त्या गावातीलच कोणीतरी प्रमुख असतो. महत्त्वचीचा व्यक्ती असते. त्यांनी जर गावातील विकासकामांसाठी निधी मागितला तर तो देणे आमचे काम आहे. त्यामुळे अशांच्या विकासकामांनाही निधी देण्यात येणार आहे.

मुश्रीफ म्हणाले, गोकुळची निवडणूक ही ठरावधारकांची निवडणूक आहे. ही सर्वसाधारण निवडणूक नाही. त्यामुळे निवडणूक पुढे जाण्याची शक्यता नाही. माघार घेणाऱ्यांना तेवढी प्रांत कार्यालयात परवानगी देण्यात येईल. तालुकावार मतदान आहे, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी आहे. त्यामुळे निवडणुकीत कोणतीही अडचण येणार नाही.

जिल्हा परिषदेच्या सदस्यांना जसा निधी दिला तसे गोकुळ ठरावधारकांना काही पॅकेज आहे का, अशी विचारणा केली असता मुश्रीफ म्हणाले, हा ठरावधारक हा त्या गावातीलच असतो. त्यांनी जर गावातील विकासकामांसाठी निधी मागितला तर तो देणे आमचे काम आहे. त्यामुळे अशांच्या विकासकामांनाही निधी देण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हा परिषदेच्या सर्वपक्षीय सदस्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांच्या निधीच्या प्रशासकीय मान्यतेचे पत्र मुश्रीफ यांनी अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील यांना सुपूर्द केले. यावेळी आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे सभापती हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, डॉ. पद्माराणी पाटील, स्वाती सासने, राजेश पाटील, राजेश लाटकर उपस्थित होते. सर्वपक्षीयांना आम्ही निधी दिल्याने विरोधकांनीही आमच्याकडे त्याच नजरेने पाहावे असाही टोला त्यांनी लगावला.

चौकट

कामगारांना कारखान्यावर लसीकरण

मुश्रीफ म्हणाले, कामगारांच्या कोरोना चाचण्यांबाबत सर्व औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी भेटले. त्यांनी अडचणी सांगितल्या. त्यानुसार या कामगारांची कारखान्यात जाण्याआधी जागेवरच अँटिजन टेस्ट करणे आणि त्यांना तेथेच लसीकरण करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळानेही त्यांच्या अडचणी सांगितल्या. लॉकडाऊनबाबत शासन व्यावहारिक मार्ग काढेल असे त्यांनी सांगितले, तर अन्नधान्याची वाहतूक करणाऱ्यांवर पोलीस गुन्हे दाखल करीत आहेत याबाबतही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

चौकट

लस नाही आणि उत्सव कसा करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस उत्सव साजरा करण्याचे आवाहन केल्याबद्दल मुश्रीफ म्हणाले, इथं लोकांना द्यायला नाही आणि उत्सव कसा करणार. इतके नागरिक मृत्यू पावल्यानंतर का असेना त्यांनी रेमडेसिविर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली याबद्दल मोदी सरकारला नोबेल पुरस्कार द्यायला पाहिजे, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.

चौकट

चंद्रकांत पाटील यांनी संधी घालविली

चंद्रकांत पाटील यांना मंत्री असताना कोल्हापूर जिल्ह्यासाठी खूप काही करण्याची संधी होती. मात्र, त्यांनी रस्त्यांसाठी निधी आणला नाही आणि जिल्ह्याच्या वाटेचे ५० टक्के पाणी अडविण्यासाठी एक रुपयाचाही निधी आणला नाही, असे आरोप करीत मी असतो तर रस्ते काचेसारखे केले असते, असा दावा मुश्रीफ यांनी यावेळी केला.