शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पंधराव्या वित्त आयोगातील निधी वितरण कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:56 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सत्तारूढ पदाधिकाऱ्यांनी पंधराव्या वित्त आयोगातून कोणाला किती निधी द्यायचा हे ठरविले असले ...

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सत्तारूढ पदाधिकाऱ्यांनी पंधराव्या वित्त आयोगातून कोणाला किती निधी द्यायचा हे ठरविले असले तरीही उच्च न्यायालयाने या निधी वितरणास १० फेब्रुवारीपर्यंत पुन्हा स्थगिती दिली आहे. त्यामुळे हे निधीचे वितरण केवळ कागदोपत्रीच राहिले आहे. उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. यावेळी ही स्थगिती देण्यात आली.

गेले पाच महिने पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीच्या असमान वितरणाबाबत उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. एकीकडे जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदलाचे वातावरण असताना दुसरीकडे प्रचंड चर्चेत असलेला हा निधीही सदस्यांच्या पदरात पडलेला नाही. त्यामुळे सदस्यांमध्ये अस्वस्थता आहे. परिणामी सध्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी लाभार्थी निश्चित करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. सहाही पदाधिकारी या योजनांच्या लाभार्थ्यांची नावे निश्चित करण्यात गुंतले आहेत.

चौकट

राजू मगदूम समझोत्याच्या मानसिकतेत

माजी महिला आणि बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम यांचे दीर राजू मगदूम यांनी या असमान निधी वितरणाबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुरुवातीला भाजपचे काही सदस्यही त्यांच्या पाठीशी होते. परंतु, सदस्य राजवर्धन निंबाळकर यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर मगदूम यांना एकाकी किल्ला लढवावा लागला. तारखांवर तारखा पडल्या. तोपर्यंत दोन्ही मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली निधी वाटपाचे सूत्रही ठरले. असे असताना एकाकी लढण्यापेक्षा झाले तेवढे पुरे झाले अशा मानसिकेतत राजू मगदूम आले आहेत. त्यामुळे कदाचित पुढच्या तारखेनंतर हा विषय संपण्याची शक्यता आहे.