शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

तुंग खुनातील फरारीस अटक

By admin | Updated: December 17, 2014 23:59 IST

पोलीस कोठडी : संशयित मुख्य आरोपीचा वडील

सांगली : तुंग (ता. मिरज) येथील आनंदा हराळे या गुंडाच्या खूनप्रकरणी फरारी असलेल्या दशरथ किसन मलमे (वय ४५, रा. तुंग) यास आज (बुधवार) सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली. गेले आठ दिवस तो फरारी होता. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. दशरथ मलमे हा खुनामधील मुख्य संशयित संपत मलमे याचा वडील आहे.या खूनप्रकरणी यापूर्वी संपत मलमे व धनाजी ऊर्फ लक्या मलमे या चुलत भावांना अटक करण्यात आली असून, दशरथ मलमे हा संपतचा वडील असल्याचे पोलिसांनी सांगितले. आनंदा हराळे याचे संशयित संपत मलमे याची बहीण अर्चना हिच्याशी अनैतिक संबंध होते. गतवर्षी तिचा विवाह झाला होता. त्यानंतरही या दोघांत अनैतिक संबंध सुरूच होते. तिने आनंदाकडे लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. यातून आनंदाने डिसेंबर २०१३ मध्ये तिच्या डोक्यात दगड घालून खून केला होता. अर्चनाचे भाऊ संपत व धनाजी त्याच्यावर चिडून होते. गुरुवारी त्यांनी आनंदाचा तुंगच्या चावडीसमोर थरारक पाठलाग करून निर्घृण खून केला होता. या खुनासाठी दशरथ मलमे याने आपल्या मुलाला प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. दशरथ मलमे यास आज येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे उभे केले असता, त्याला २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव करीत आहेत. (प्रतिनिधी)आठ दिवस फरारीदशरथ मलमे हा गेले आठ दिवस फरार होता. पोलिसांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. आज तो घरी आल्याचे समजताच पोलिसांनी त्याला अटक केली. खुनामध्ये त्याचा सहभाग किती आहे, याची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.