गडहिंग्लज आगारात इंधन बचत कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:24 IST2021-01-20T04:24:17+5:302021-01-20T04:24:17+5:30
गडहिंग्लज आगारातर्फे इंधन बचत कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विभागप्रमुख विजय मोहिते यांच्या हस्ते झाले. ...

गडहिंग्लज आगारात इंधन बचत कार्यक्रम
गडहिंग्लज आगारातर्फे इंधन बचत कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विभागप्रमुख विजय मोहिते यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक संजय चव्हाण होते.
यांत्रिक कर्मचारी व चालकांची इंधन बचतीत मोठी जबाबदारी आहे. इंधनाचा साठा कमी असून त्याचा जपून वापर करावा. इंधनाची योग्यता तपासली पाहिजे. इंधनाची बचत म्हणजेच इंधनाची निर्मिती आहे, असेही मोहिते यांनी सांगितले.
यावेळी सहायक कार्यशाळा अधीक्षक व्ही. के. शिंदे, सहायक वाहन निरीक्षक लिमकर गावडे, वरिष्ठ लिपिक व्ही. जी. जोशी आदी उपस्थित होते.
------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज आगारात इंधन बचत कार्यक्रमात विजय मोहिते यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्ही. के. शिंदे, लिमकर गावडे, व्ही. जी. जोशी आदी उपस्थित होते.
क्रमांक : १९०१२०२१-गड-०७