शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रमाग कामगारांचा सोमवारी मोर्चा

By admin | Updated: July 7, 2015 01:36 IST

किमान वेतनाची मागणी : आठवड्यानंतर बेमुदत संप; लालबावटा संघटनेच्या मेळाव्यात घोषणा

इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनाची अंमलबजावणी त्वरित चालू करावी, या मागणीसाठी १३ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा लालबावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेच्या मेळाव्यात केली. तसेच आठवडाभरात सायझिंग-वार्पिंग कामगार बेमुदत संपावर जातील, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला. यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनाच्या फेररचनासाठी लालबावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने उच्च न्यायालयात दाद मागितली. तेव्हा राज्य शासनाने २९ जानेवारी २०१५ रोजी किमान वेतनाच्या फेररचनेची अधिसूचना जारी केली. फेररचनेची अंमलबजावणी सुरू करावी यासाठीसुद्धा राज्यातील विविध संघटना आंदोलने करीत आहेत. त्यासाठी भिवंडी, सोलापूर व इचलकरंजी याठिकाणी कामगार परिषदा झाल्या. सर्वांची राज्यव्यापी कृती संघटना माजी आमदार नरसय्या आडाम यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित झाली. २० मे रोजी मुंबई येथील मोर्चा काढला. यावेळी माजी आमदार आडाम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाबरोबर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कामगार मंत्री व वस्त्रोद्योग मंत्री यांनी हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दोनवेळा नियोजित बैठका शासनाकडून रद्द झाल्या. शासनाच्या अशा प्रकारच्या चाल-ढकल धोरणाच्या विरोधात सोमवारी येथील समाजवादी प्रबोधिनीमध्ये सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेचा मेळावा झाला. मेळाव्यामध्ये कामगार नेते ए. बी. पाटील, आनंदराव चव्हाण, सुभाष निकम, कृष्णात कुलकर्णी, दशरथ जाधव, मनोहर ढवळे, हणमंत मुत्तूर, सूर्यकांत शेंडे, मारुती जाधव, चंद्रकांत गागरे व शिवलाल कोलप यांची भाषणे झाली. इचलकरंजी येथून पुन्हा लढा उभारण्यासाठी १३ जुलैला इचलकरंजीतील शाहू पुतळ्यापासून मोर्चा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर येणार आहे. त्याचबरोबर आठवड्याभरात ठोस निर्णय न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा मेळाव्यामध्ये देण्यात आला. (प्रतिनिधी)