शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

घोरपडे कारखान्याचा मार्ग मोकळा

By admin | Updated: December 6, 2014 00:46 IST

हायकोर्टाचा निकाल : गळितावरील स्थगिती उठविली; मंडलिक कारखान्यास दंड

कागल : कागल तालुक्यासह जिल्ह्यातील साखर कारखानदारीचे लक्ष लागून राहिलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या गळीत हंगाम स्थगितीविषयी न्यायालयीन निकाल अखेर आज, शुक्रवारी जाहीर झाला. उच्च न्यायालयाने १० आॅक्टोबर रोजी दिलेली स्थगिती उठविली. याचिका दाखल करणाऱ्या सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्यास एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला. दुपारी या निकालाची बातमी कागल तालुक्यात येताच मुश्रीफ गटाच्या समर्थकांनी गावागावांत फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद व्यक्त केला. बेलेवाडी काळम्मा येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या विरोधात हवाई अंतर, ऊस उपलब्धता, परवाने, या मुद्द्यांवर हमीदवाडा येथील मंडलिक कारखान्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ऐन विधानसभा निवडणुकीतच न्यायालयाने १० आॅक्टोबर रोजी गळीत हंगाम घेण्यास मनाई आदेश दिला. त्यानंतर १४ आॅक्टोबर, २० नोव्हेंबर, २६ नोव्हेंबर, २८ नोव्हेंबर, अशा सुनावणीच्या तारखा वाढत गेल्या. आज सकाळी १२ वाजल्यापासून तालुकाभर निकालाचे काय झाले, याची चौकशी सुरू होती. दु. ३.१५ ला मुख्य न्यायाधीश न्या. मोहित शहा, न्या. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने गळीत हंगामासाठी स्थगिती उठविली. कारखान्यातर्फे अ‍ॅड. जहागिरदार, अ‍ॅड. दाणी, अ‍ॅड. पटवर्धन, अ‍ॅड. खलिदी यांनी काम पाहिले. गळीत हंगामाची स्थगिती उठविल्याचे समजताच मुश्रीफ समर्थकांनी जल्लोष केला, तर गळीत हंगाम तातडीने सुरू करण्यासाठी ऊस तोडणी यंत्रणा आणि इतर यंत्रणा सक्रिय करण्यात आली. लवकरच मोठा कार्यक्रम : मुश्रीफहंगामाचा शुभारंभ शरद पवार आणि विक्रमसिंह घाटगे यांच्या हस्ते करणार होतो. मात्र, न्यायालयीन स्थगितीमुळे हे करता आले नाही. उद्याच मी विक्रमसिंहराजेंना भेटणार असून लवकरच कारखाना कार्यस्थळावर मोठा कार्यक्रम होणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. चिकोत्रा खोऱ्यात आतषबाजीदरम्यान, घोरपडे साखर कारखान्याच्या गळीत हंगामास दिलेली स्थगिती उठविल्याचे वृत्त चिकोत्रा खोऱ्यात दुपारी पोहोचताच गावोगावी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तसेच मुरगूड, म्हाकवेसह बानगे, आणूर, बस्तवडे, परिसरात मुश्रीफ समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.