शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अंधावर झाली मोफत नेत्ररोपण शस्त्रक्रिया

By admin | Updated: October 6, 2014 22:34 IST

१५ वे नेत्रदान : नेत्रदान चळवळीत पडले पुढचे पाऊल

गडहिंग्लज : अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामस्थांनी सामाजिक बांधीलकीतून सुरू केलेल्या नेत्रदान चळवळीचे आणखी एक पाऊल पुढे पडले. येथील नारायण बंडू पाटील (वय ४३) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. चळवळीतील हे १५ वे नेत्रदान ठरले. पाटील यांच्या नेत्रांचा उपयोग करीत खानापूर व बेळगाव येथील अंधावर मोफत नेत्ररोपण शस्त्रक्रिया झाली. यानिमित्ताने दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या नेत्रदान चळवळीने एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे.नारायण पाटील यांचे निधन झाले. त्यांचे पुत्र रवींद्र यांच्यासह कुटुंबीयांनी पाटील यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. येथील अंकुर आय हॉस्पिटलच्या स्वाती लोखंडे यांच्यासह सहकाऱ्यांनी तातडीने नेत्रगोल काढण्याची प्रक्रिया पार पडली. यापूर्वी चळवळीअंतर्गत झालेल्या नेत्रदानातून मिळालेले नेत्रगोल सांगली येथील नेत्रपेढीला पाठविले जात होते. तेथील प्रतीक्षा यादीतील रुग्णांवर नेत्ररोपण शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. मात्र, नारायण पाटील यांचे मरणोत्तर नेत्रदान मिळाल्यानंतर डॉ. सदानंद पाटणे यांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या (बेळगाव) डॉ. शुभांगी पाटील यांच्याशी संपर्क साधला. नेत्रगोल व आपल्याकडे तपासणी झालेले रुग्ण पाठवित असल्याचे सांगितले. पाटील यांनीही शस्त्रक्रियेसाठी सहकार्याचे आश्वासन दिले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉ. पाटील यांनी या रुग्णाची पुन्हा तपासणी केली. यातील खानापूर येथील रुग्णांवर नेत्ररोपण शस्त्रक्रिया करणे शक्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर डॉ. पाटील यांनी खानापूर येथील अंधासह बेळगाव येथील एका रुग्णावर मोफत नेत्ररोपण शस्त्रक्रिया केली. चळवळीत मिळालेल्या नेत्रदानातून डॉ. पाटणे यांच्याकडे तपासणी झालेल्या रुग्णावर मोफत शस्त्रक्रियाही यशस्वी झाली. (प्रतिनिधी)चळवळीअंतर्गत झालेल्या शिबिरात दुंडगे, करंबळी, चिंचेवाडी, महागाव येथील अंध रुग्णांची डॉ. पाटणे यांनी पुन्हा तपासणी केली. करंबळी, चिंचेवाडी व महागाव येथील रुग्णांना बेळगाव येथे शस्त्रक्रियेसाठी पाठविले, तर डॉ. पाटणे यांच्याकडेच उपचार सुरू असणाऱ्या रुग्णालाही नेत्ररोपण शस्त्रक्रियेसाठी बेळगावला जाण्यास सांगितले.