शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाईच्या भाविकांना गुडघेदुखीची औषधे देऊन फसवणुकीचा फंडा; टोळीच कार्यरत : भाविकांच्या असाहाय्यतेचा घेतला जातोय फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना गुडघेदुखीची औषधे देऊन फसवणुकीचा नवा फंडा सुरू असल्याचे उघडकीस आले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना गुडघेदुखीची औषधे देऊन फसवणुकीचा नवा फंडा सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. परभणीतील एका वकिलाच्या, गुडघ्याचा त्रास असलेल्या सासूबाईंना अशाच पध्दतीने फसविण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांनी वकिली खाक्या दाखविल्यावर फसवणूक टळली.

अंबाबाईसह महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अशा पध्दतीने फसवणूक करणारी टोळीच असल्याचा संशय आहे. यातील गिऱ्हाईक मिळवून देणारी टोळी इचलकरंजी परिसरातील असल्याचे सांगण्यात येते. मंदिराच्या आवारात लंगडत किंवा अन्य काही त्रास असलेला भाविक निघाला, की ही टोळी त्यांच्यावर धाडच टाकते. अंबाबाई मंदिरात बिनखांबी गणेश मंदिराकडून भाविक आला की, तिथे हे लोक थांबलेले असतात. परभणीचे कुटुंब सहपरिवार आले होते. संबंधित वकील सासुबाईंना घेऊन थांबले होते. त्यांचे वय जास्त असल्याने गुडघेदुखीचा त्रास आहे. एक खेडवळ माणूस आला व सासुबाईंकडे पाहून गुडघेदुखीची चौकशी करू लागला. ‘इथे जवळच आयुर्वेदिक औषध दुकान आहे. तिथे गुडघेदुखीवर हमखास तेल मिळते,’ असे त्याने सुचविले. ‘चला, मी तुम्हाला दुकान दाखवतो. माझ्या वडिलांना खूप फरक पडला. दहा-दहा मैल चालतात,’ असे सांगत त्याने आग्रहच केला. तरीही वकील तयार नव्हते. पण ‘काय साहेब, तुम्ही आपल्या माणसासाठी एवढं करू शकत नाही का,’ असे बोलल्यावर नाईलाजाने ते दुकानात गेले. मंदिराच्या जवळच हे आयुर्वेदिक दुकान आहे. दुकानात महिला बसली होती. त्या माणसाने कसलेसे नाव सांगून तेलाची बाटली मागितली. त्या बाईने तेलाची बाटली देताच त्याने ती हातात घेऊन टोपण उघडले व कसे झक्कास औषध देतो, असे सांगून दुकानातील तेलाच्या बाटलीत गुळवेल सत्त्व पावडर व अजून कुठली तरी पावडर मिसळली. त्या बाईनेही तत्परता दाखवत सर्व एकत्र केले. तोपर्यंत, पैसे किती लागतील हे मात्र मला सांगण्यास टाळले. पैशाची विचारणा केल्यावर, बिल ऐकून थक्कच झालो. ती कसली तरी पावडर प्रत्येकी २०० रुपये ग्रॅम, म्हणजेच ५ ग्रॅमचे एक हजार, सात ग्रॅमचे १४०० व नऊ ग्रॅमचे १८०० आणि बाटलीचे शंभर रुपये, असे एकत्रित ४३०० रुपये बिल झाल्याचे सांगितले. वकिलांनी दुकानदार महिलेस कायद्याच्या भाषेत सुनावल्याने त्यांची फसवणूक टळली. परंतु अशाच प्रकारचा गैरफायदा ज्येष्ठ नागरिकांच्या आजारपणाचा घेतला जाऊ शकतो.

काही महिन्यापूर्वी धनकवडी परिसरातील मठात मी गेलो असता, दादा काय झालं हो, असे म्हणत एक महिला आली व तिने सांगितल्याप्रमाणे कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नरच्या आयुर्वेदिक दुकानातून औषधे घेतल्याचा मला ५८ हजार रुपयांना फटका बसला आहे. ही मोठी टोळी असून पक्षाघातासह विविध आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांच्या असाहाय्यतेचा ते गैरफायदा घेतात.

- शिवशाहीर राजू राऊत

शिवाजी पेठ कोल्हापूर.