शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

दोघांकडून चार तरुणींचे शोषण, साथीदार शाहरूख देसाई कराडमधून जेरबंद; गरज पडल्यास एसआयटी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 10:01 IST

शोषण गुन्ह्याचा तपास उपअधीक्षक ठाकूर यांच्याकडे; मोबाइल फॉरेन्सिक तपासणीसाठी

कोल्हापूर : तरुणींचे शोषण करून अश्लील व्हिडीओ तयार केलेल्या गुन्ह्याची व्याप्ती वाढत असून, याचा तपास जयसिंगपूरचे शाहरूख देसाई पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्याकडे सोपवण्यात आला. या गुन्ह्यातील दुसरा आरोपी शाहरूख हुसेन देसाई (वय ३०, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) याला मंगळवारी (दि. २८) कराडमधून अटक केली. याप्रकरणी आणखी एक तक्रार वाढली असून, दोन्ही आरोपींचे मोबाइल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी मंगळवारी सांगितले. गरज पडल्यास तपासासाठी एसआयटी स्थापन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?

एकही व्हिडीओ व्हायरल नाहीत

अटकेतील सनदे याचे फार्मसीचे शिक्षण झाले असून, देसाई हा अभियंता आहे. तो सध्या महावितरणमध्ये कार्यरत आहे. त्यांचे दोन्ही मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यातील एकही व्हिडीओ, फोटो व्हायरल झालेलानसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील एका महाविद्यालयात

शिक्षण घेताना प्रेमाच्या जाळ्यात ओढून शाहीद समीर सनदे (२२, रा. शिरोली पुलाची) याने तरुणींचे शोषण केले. यात त्याचा मित्र शाहरूख देसाई याचाही सहभाग होता. तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीसआणल्यानंतर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा घडल्याचे ठिकाण हातकणंगले तालुक्यात असल्याने तो हातकणंगले पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. 

अटकेनंतर सनदे याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. या गुन्ह्यातील दुसरा आरोपी शाहरूख देसाई याला पोलिसांनी मोबाइल लोकेशनवरून कराडमधून अटक केली. त्यानेही दोन तरुणींचे शोषण केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्याच्या विरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दोन्ही आरोपींचे मोबाइल जप्त करून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. तपासणीनंतर त्यातील व्हिडीओ आणि फोटो मिळतील, अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली.

तरुणींचे शोषण करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी कोल्हापुरात सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायंकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयात मोठी गर्दी केली होती.

सकल हिंदू समाज आक्रमक

'दोन्ही आरोपींनी जाणीवपूर्वक हिंदू तरुणींना लक्ष्य केल्याचे दिसते. त्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांचा पोलिसांनी शोध घ्यावा. तरुणींची फसवणूक करणारे रॅकेट उद्ध्वस्त करावे. अन्यथा सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून चुकीच्या प्रवृत्तींचा बंदोबस्त करतील,' असा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीने उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी पोलिसांसोबत मंगळवारी सायंकाळी मुख्यालयात झालेल्या बैठकीत दिला. यावेळी सकल हिंदू समाजाचे ४०० ते ५०० कार्यकर्ते उपस्थित होते. यात महिलाही मोठ्या संख्येने होत्या.

....तर एसआयटीची स्थापना

प्रथमदर्शनी चार तरुणींचे शोषण झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. दोन्ही आरोपींनी दोन वेगवेगळ्या तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. गुन्ह्याची ठिकाणे आणि कालावधी वेगळा आहे. आणखी काही तक्रारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गरज पडल्यास तपासासाठी एसआयटी स्थापन केली जाईल, असे पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Four girls exploited; accomplice arrested in Karad; SIT possibility.

Web Summary : Two men exploited four girls, creating obscene videos. One accomplice was arrested in Karad. Police seized mobiles for forensic analysis. More complaints are expected, potentially leading to a Special Investigation Team (SIT) formation.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी