कृष्णा नदीत वाहून गेल्याने चार जण बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:18 IST2021-06-29T04:18:00+5:302021-06-29T04:18:00+5:30

परसप्पा गोपाळ बनसुडे (वय ४२), सदाशिव गोपाळ बनसुडे (वय ३५), शंकर गोपाळ बनसुडे (वय २५) आणि धरेप्पा गोपाळ बनसुडे ...

Four persons go missing after being swept away in Krishna river | कृष्णा नदीत वाहून गेल्याने चार जण बेपत्ता

कृष्णा नदीत वाहून गेल्याने चार जण बेपत्ता

परसप्पा गोपाळ बनसुडे (वय ४२), सदाशिव गोपाळ बनसुडे (वय ३५), शंकर गोपाळ बनसुडे (वय २५) आणि धरेप्पा गोपाळ बनसुडे (वय २२, सर्व रा. हल्याळ, ता. अथणी) अशी नदीत वाहून गेल्याने बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. हे चारही जण एकाच कुटुंबातील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दरूर गावामधील सालसाब उरूस जवळ आला आहे. त्यामुळे गावातील घरोघरी स्वच्छता, साफसफाई सुरू आहे. गावातील लोक गावालगतच्या कृष्णा नदीकाठी कपडे वगैरे धुण्यासाठी जातात. त्यानुसार बनसुडे कुटुंबातील उपरोक्त चौघे जण नदीच्या काठी घरातील अंथरूण-पांघरूण धुण्यासाठी गेले होते. कपडे धुताना त्यांच्यापैकी एकाचा पाय घसरून तो नदीच्या पात्रात पडला. त्यावेळी इतर तिघा जणांनी त्याला वाचविण्याच्या प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने कृष्णा नदीपात्रातील पाण्याच्या जोरदार प्रवाहाबरोबर ते चौघेही वाहून गेले.

Web Title: Four persons go missing after being swept away in Krishna river