शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
7
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
8
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
9
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
10
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
11
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
12
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
13
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
14
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
15
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
16
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
17
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
18
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
19
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
20
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश

Kolhapur: पुणे-बंगळुरू महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स उलटली, चार प्रवासी जखमी

By उद्धव गोडसे | Updated: May 26, 2025 13:04 IST

महामार्ग रूंदीकरणाचे काम सुरू असल्याने अपघातांची संख्या वाढली आहे.

उद्धव गोडसेकोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गावर अंबप फाटा (ता. हातकणंगले) येथे खासगी ट्रॅव्हल्स उलटून झालेल्या अपघातात चार प्रवासी जखमी झाले. जगदीश पुजारी (वय ४२), उषा पुजारी (३३, सध्या दोघे रा. बिबेवाडी, पुणे, मूळ रा. केरळ) आणि रतन जयराम अनशन (४०, रा. लोअर परळ, मुंबई) अशी जखमींची नावे आहेत. यासह एक मुलगाही जखमी झाला. हा अपघात सोमवारी (दि. २६) सकाळी सातच्या सुमारास घडला. खासगी बस बंगळुरूहून पुण्याकडे निघाली होती.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची बस बंगळुरूहून पुण्याकडे निघाली होती. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास अंबप फाटा येथे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस उलटली. काही अंतर घसरत गेलेली बस मातीच्या ढिगा-याजवळ जाऊन थांबली. या अपघातात बसमधील चार प्रवासी जखमी झाले.जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. अपघातावेळी बसची गती कमी असल्याने जीवितहानी टळली. तीन दिवसांपूर्वीच या परिसरात मेनन पिस्टन कंपनीजवळ खासगी ट्रॅव्हल्सने ट्रकला धडक दिली होती. त्या अपघातात एक ठार, तर १६ प्रवासी जखमी झाले होते. महामार्ग रूंदीकरणाचे काम सुरू असल्याने अपघातांची संख्या वाढली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गAccidentअपघात