वित्त आयोगाच्या निधीबाबत सूत्र निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:27 IST2021-08-26T04:27:34+5:302021-08-26T04:27:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी वाटपाचे सूत्र ठरले आहे. ...

The formula for the funding of the Finance Commission is fixed | वित्त आयोगाच्या निधीबाबत सूत्र निश्चित

वित्त आयोगाच्या निधीबाबत सूत्र निश्चित

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी वाटपाचे सूत्र ठरले आहे. त्याला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनीही मान्यता दिली आहे. सर्वसाधारण सभेत सांगितल्याप्रमाणे दोन दिवसात याबाबतच्या सूचना सदस्यांना दिल्या जातील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील सडोलीकर यांनी दिली.

मंगळवारी झालेली सर्वसाधारण सभा ही पंधराव्या वित्त आयोगावरून जोरदार होईल, अशी अटकळ होती. परंतु सभा संपता संपता ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले, सतीश पाटील, राहुल आवाडे यांच्यासह काही सदस्यांनी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा मुद्दा उपस्थित केला. मुळात दिवस कमी राहिले आहेत. मध्येच विधानसभेची आचारसंहिता लागू शकते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोकाही आहे. त्यामुळे कामांमध्ये अडथळा येऊ शकतो. पुन्हा निवडणुकीला सामोरे जायचे असल्याने लवकर कामे सुरू करण्यासाठी निधीचा मुद्दा संपवावा, अशी सदस्यांची आग्रही मागणी आहे. याबाबतचे अधिकारी अध्यक्ष पाटील यांना दिल्याचे सभेत सदस्यांनी सांगितले.

त्यानुसार अध्यक्ष पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सदस्यांच्या भावना योग्य आहेत. निधी वितरणाला विलंब झाला आहे. परंतू सदस्यांनी याबाबत मला अधिकार दिले असले तरी मी मंत्री मुश्रीफ आणि पालकमंत्री पाटील यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला आहे. त्यांच्या सूचनेनुसारच निधी वितरणाचे सूत्र ठरवण्यात आले आहे. दोन दिवसात याबाबत सदस्यांना सूचना देण्यात येणार आहेत.

Web Title: The formula for the funding of the Finance Commission is fixed