शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राला आरक्षणाचा ठराव संसदेत मंजूर करण्यास भाग पाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:22 IST

या पत्रामध्ये समाजातर्फे आरक्षण संसदेतही मंजूर करून घेण्यास केंद्र सरकारला भाग पाडावे. यासोबतच समाजाला सक्षम करण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकमत करून ...

या पत्रामध्ये समाजातर्फे आरक्षण संसदेतही मंजूर करून घेण्यास केंद्र सरकारला भाग पाडावे. यासोबतच समाजाला सक्षम करण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकमत करून प्रयत्न करावेत, अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक झाल्यास त्यास सर्वस्वी राज्यशासन व लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील. सर्व मंत्री, खासदार, आमदार यांनी आपली लेखी भूमिका स्पष्ट करावी. यासह अन्य मागण्यांबाबतचे पत्र सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्यातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी पाठविण्यात आले. याच्या प्रति उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे नेते व मंत्री अशोकराव चव्हाण यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. या पत्रावर मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, दिलीप देसाई, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष ॲड. गुलाबराव घोरपडे, हर्षल सुर्वे, संदीप देसाई, शशिकांत पाटील, शाहीर दिलीप सावंत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

मागण्या अशा

- समाजाला घटनात्मक आरक्षण देण्यासाठी राज्य विधिमंडळात आरक्षणाचा ठराव करून तो केंद्राला पाठवावा. तेथे हा ठराव संसदेत मंजूर करून घेण्यास भाग पाडावे. राष्ट्रपतींच्या सहीने समाजाला घटनात्मक आरक्षण मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी.

-आरक्षण मिळेपर्यंत समाजाला राजर्षी शाहू महाराज शिक्षण, प्रशिक्षण, मानव विकास संस्था(सारथी) व कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची भरीव तरतूद करून संस्था सक्षम कराव्यात. त्यांचा विस्तार करावा. या संस्थांची उपकेंद्र राज्यभरात व्हावीत. या संस्थेवर मराठा समाजातील तज्ज्ञांचा समावेश करावा. सारथीसाठी २००० कोटींचा निधी द्यावा. कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करा.

- अण्णासाहेब पाटील अर्थिक महामंडळात शैक्षणिक कर्जाचा समावेश करावा. कर्ज वितरणात सुलभता आणावी. कर्जाची मर्यादा वाढवावी. या महामंडळासाठी ५००० कोटीपर्यंत तरतूद करावी.

-राज्य शासनाने केंद्राला घटनात्मकरीत्या टिकणारे आरक्षण देण्यासाठी संसदेत तसा ठराव करण्यासाठी घटना दुरुस्तीकरिता भाग पाडावे.

- मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीकरिता ओबीसीप्रमाणे शैक्षणिक शुल्क रचना करावी.

- सरकारी नोकरीत मराठा आरक्षणातून ज्यांची निवड झाली आहे, त्यांना तत्काळ नोकरीवर रुजू करून घ्यावे.

- ओबीसीप्रमाणे मराठा समाजालाही नाेकरी व शिक्षणांमध्ये सुविधा द्या.

- कोरोनावर मात करण्यासाठी पक्षीय राजकारण थांबवावे.

-बाजारमूल्यांवर आधारित हमीभाव लागू करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा.

- छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार राज्य शासनाने भारतात परत आणावी.

- छत्रपती शिवाजी महाराजांची जिवंत स्मारक म्हणजे गडकिल्ले जतन व संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.