शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

महापूर येतो फुटाफुटाने, उतरतो मात्र केवळ इंचाइंचाने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 12:29 AM

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातून शेवटच्या राजापूरवाडी बंधाºयानंतर कृष्णा नदी कर्नाटकात जाते. तेथून साडेतीन लाखांहून अधिक क्युसेक्स पाणी पुढे सरकत होते.

ठळक मुद्देअलमट्टीचा कोणताही संबंध नाही पूर (अ) नियंत्रण रेषा : कृष्णा खोऱ्यात दोन डझन नद्या; पाणी पुढे सरकण्यास जागाच नाही

वसंत भोसले ।कोल्हापूर : कृष्णा खोºयातील पावसाचे प्रमाण कमी झाले परिणामी धरणातील पाण्याचा विसर्गही कमी झाला. तरीही महापुराचे पाणी इंचाइंचानेच का उतरते आणि चढताना मात्र फुटाफुटाने का चढत होते, असा सवाल लोकांच्या मनात येऊ लागला आहे.

कृष्णा खोºयात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात उगम पावणाºया दोन डझन नद्या आहेत. या सर्व नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सलग नऊ दिवस अतिवृष्टी होत होती. परिणामी यापैकी चौदा नद्यांवर असलेल्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. ते पाणी तसेच मुक्त पाणलोट क्षेत्रात पडणारे पावसाचे पाणी कृष्णेत येत होते. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातून शेवटच्या राजापूरवाडी बंधाºयानंतर कृष्णा नदी कर्नाटकात जाते. तेथून साडेतीन लाखांहून अधिक क्युसेक्स पाणी पुढे सरकत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठीच अलमट्टी धरणाच्या पाण्याचा या महापुराशी काही संबंध नाही हे सांगलीत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते, ते खरे आहे. कृष्णा नदीला महाराष्ट्रात मिळणाºया नद्यांशिवाय भुदरगड, राधानगरी, आजरा आणि चंदगड या तालुक्यातून उगम पावणाºया नद्यांचे पाणीही अलमट्टी धरणातच जाते.परिणामी अलमट्टीतून चार ते पाच लाख क्युसेक्स पाणी सोडण्यात येऊ लागले. तरी महाराष्ट्रातील महापूर ओसरेना, अशीच भावना जनतेची झाली.

दरम्यान, इंचाइंचाने पाणी उतरण्याचे मुख्य कारणच पूर नियंत्रण रेषेत आलेल्या माणसांची गर्दी आणि झालेल्या बांधकाम हे आहे. शिवाय सर्वच नद्यांच्या मार्गावर रस्ते, आणि पुलांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात झाले आहे. पाणी वाढले होते, ते याच कारणांनी आणि आता उतरतही नाही याच कारणांमुळे, हे स्पष्ट झाले आहे. जेव्हा महापूर होता तेव्हा पुलाखालून पाणी पूर्णपणे जातच नव्हते, त्यामुळे रस्त्यावर पाणी घालून घेतले होते. पाण्याचा निचरा अधिक होत होता. महापूर कमी होताच रस्यावरून जाणारे पाणी थांबले आणि फक्त पुलाखालुन असलेल्या वाटेनेच जाऊ लागले. ती अरूंद वाटच पाणी इंचाइंचाने उतरवित आहे. त्यामुळे या महापुराचा धोका आता कायमचा झाला आहे. किंबहुना आपण तो तयार करून घेतला आहे.

धरणे भरली, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आणि मुक्त पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सलग आठ दिवस झाली की महापुराचा फटका दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सीमावर्ती कर्नाटक राज्याला बसणार. हे आता गणित घातल्यानंतर सुटणाºया कोड्याचे अचूक उत्तर असणार आहे. धरणे पूर्ण क्षमतेने भरणे, पाण्याचा विसर्ग सुरू होणे आणि अतिवृष्टी याचा योग जुळून आला की, महापुराचे आगमन आणि त्यानंतरच विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन होणार हे आता आपण अपेक्षित धरुन तयार रहायला पाहिजे.शेतीला सर्वाधिक फटकाया सर्व पूर नियंत्रण रेषेवरील शहरी आक्रमणाचा सर्वात मोठा फटका शेतकरी वर्गाला बसतो. शहरातील माणूस पाणी चढताच आठ दहा दिवस घर सोडून जातो. मात्र या तिन्ही जिल्ह्यातील पाचशेहून अधिक गावांतील सुमारे दोन लाख हेक्टरमधील पीकच उद्ध्वस्त होते, शेतकरी उद्ध्वस्त होतो. पूर रेषेत काही करण्यापूर्वी त्याचा परिणाम नदीच्या प्रवाही पाण्याची अडवणूक होणार नाही, याचा विचार केला पाहिजे. अन्यथा दक्षिण महाराष्ट्र हा तिन्ही ऋतूत श्रेष्ठ असणाºया पैकी पावसाळा कायम आपणास धोक्याच्या पातळीवर घेऊन जाणारा ठरणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणriverनदी