मुरगुडात पाच कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:24 IST2021-04-04T04:24:59+5:302021-04-04T04:24:59+5:30

: मुरगूड शहराला पुन्हा नव्याने कोरोनाने विळखा घालायला सुरुवात केली आहे. कालपासून शहराच्या विविध भागांतील पाचजणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ...

Five corona positive in the chin | मुरगुडात पाच कोरोना पॉझिटिव्ह

मुरगुडात पाच कोरोना पॉझिटिव्ह

: मुरगूड शहराला पुन्हा नव्याने कोरोनाने विळखा घालायला सुरुवात केली आहे. कालपासून शहराच्या विविध भागांतील पाचजणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सूर्यवंशी कॉलनीत राहणाऱ्या ४२ वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला; तर पुण्याहून परतलेल्या आत्मरूप गणेश मंदिरानजीकच्या एकाचा खासगी लॅबमधून पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याची माहिती मिळाली. या कुटुंबाच्या प्रथम संपर्कातील बाराजणांचे स्वॅब घेतल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयातून मिळाली. बाजार पेठेतील दोघांचा आणि परीट गल्ली येथील एकाच अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णांच्या संपर्कातील आलेल्या लोकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, नगरपालिका व आरोग्य प्रशासनाने नागरिकांना मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि नियमित हात धुणे, स्वच्छता ठेवण्याचे व सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Five corona positive in the chin