शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

परितेतील गर्भलिंग चाचणीप्रकरणी पाचजणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील बेकायदा गर्भलिंग तपासणी केंद्रावर छापा टाकून पोलिसांनी सातजणांविरोधात गुन्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील बेकायदा गर्भलिंग तपासणी केंद्रावर छापा टाकून पोलिसांनी सातजणांविरोधात गुन्हा दाखल केला. यातील पाचजणांना अटक केली आहे. घरमालक साताप्पा कृष्णा खाडे (वय ४२, रा. परिते, ता. करवीर), गर्भलिंग निदानासाठी आणलेल्या महिलेचा पती अनिल भीमराव माळी (३६), एजंट भारत सुकुमार जाधव (३६, रा दोघेही हुपरी, ता. हातकणंगले), एजंट सचिन दत्तात्रय घाटगे (४२, रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी), बनावट डॉक्टर महेश सुबराव पाटील (३०, रा. सिरसे, ता. राधानगरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. राजमाता यशवंत माळी (६३, रा. हूपरी, ता. हातकणंगले) या वयोवृद्ध असल्याने नोटीस देण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार राणी कांबळे (रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी) ही फरार आहे. या प्रकरणात साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

परिते येथील साताप्पा खाडे यांच्या घरामध्ये अवैधरीत्या गर्भलिंग तपासणी केंद्र असल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक चव्हाण यांना मिळाली. त्यांनी पोलीस पथक पाठवून रविवारी खाडे यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी गर्भलिंग तपासणी होत असल्याचे समोर आले. दरम्यान, पोलीस आल्याची चाहूल लागताच गर्भलिंग तपासणी केंद्र चालविणारी राणी कांबळे फरार झाली. मात्र, पोलिसांनी तिचा सहकारी बनावट डॉक्टर महेश पाटील, एजंट सचिन घाटगे, भारत जाधव, घरमालक साताप्पा खाडे, अनिल माळी या पाचजणांना अटक केली. त्यांच्याकडून ३० हजार १०० रुपयांची रोकड, एक सोनोग्राफी मशीन, औषधे व इंजेक्शन असा सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. करवीरच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुवर्णा पाटील, इस्पुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी योगिता अग्रवाल, खुपिरे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सरिता थोरात, परिते आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका मीरा भांगरे, आरोग्य सेवक जालिंदर काताडे, ॲड. गौरी पाटील यांच्या पोलीस पथकाने कारवाईमध्ये सहभाग घेतला.

कोट

परितेमधील गर्भलिंग तपासणी प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल. यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांवर कडक कारवाई होईल. या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्याचे काम सुरू आहे.

शैलेश बलकवडे,

जिल्हा पोलीस अधीक्षक