कोल्हापूर : ‘गोकुळ’शी संलग्न व अवसायनाचे मध्यंतरी आदेश काढलेल्या ११०८ दूध संस्थांचे म्हणणे घेऊन त्यावर निर्णय देऊनच निवडणूक घ्या, अशी याचिका तामगाव (ता. करवीर) येथील सद्गुरू सहकारी दूध संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंचकडे केली आहे. यावर, उद्या, गुरुवारी सुनावणी होणार आहे.न्यायालयाने अवसायनाचे मध्यंतरी आदेशावरील मंत्री व दुग्धविभागाने दिलेली स्थगिती उठविल्यानंतर संबंधित ११०८ संस्थांकडून म्हणणे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण, त्या संस्थांचे म्हणणे घेत असताना निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याची मागणी ‘गोकुळ’च्या वतीने करण्यात आली होती. त्यावर, काही संस्थांनी हरकत घेतली आहे. सदगुरु दूध संस्थेचे अध्यक्ष माणिक भानुदास जोंधळेकर यांनी ‘त्या’ ११०८ संस्थांचे म्हणणे घेऊन त्यावर अवसायनाबाबत निर्णय घेतल्याशिवाय निवडणूक प्रक्रिया राबवू नये, अशी याचिका कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल केली आहे. यावर, उद्या सुनावणी होत असून न्यायालय काय निर्णय देणार? याकडे जिल्ह्यातील दूध संस्थांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Tamgaon's milk society petitioned Kolhapur circuit bench: decide on 1108 institutions before Gokul election. Court will hear the case tomorrow. The petition argues against holding elections before resolving the status of these institutions facing liquidation.
Web Summary : तामगाँव की दूध सोसायटी ने कोल्हापुर सर्किट बेंच में याचिका दायर की: गोकुल चुनाव से पहले 1108 संस्थानों पर निर्णय लें। अदालत कल मामले की सुनवाई करेगी। याचिका में परिसमापन का सामना कर रहे इन संस्थानों की स्थिति हल करने से पहले चुनाव कराने का विरोध किया गया है।