शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

पहिले प्रेम कधीच विसरत नाही

By admin | Updated: October 9, 2014 00:46 IST

कलाकारांचा संवाद : ‘इश्कवाला लव्ह’ या मराठी चित्रपटाचे प्रमोशन, ‘लोकमत युवा नेक्स्ट’

कोल्हापूर : प्रत्येकाने आयुष्यात कुणावर तरी प्रेम केलेले असते. ते प्रेम यशस्वी होवो अगर न होवो; परंतु, पहिले प्रेम कधीही आठवले तर मनाला एक वेगळाच आनंद देते, अशा भावना चित्रपट अभिनेत्यांबरोबर युवक-युवतींनी काल, मंगळवारी व्यक्त केल्या. निमित्त होते... ‘लोकमत युवा नेक्स्ट’तर्फे आयोजित ‘इश्कवाला लव्ह’ या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनचे.मोरेवाडी येथील भारती विद्यापीठ फॉर्मसी कॉलेज व राजाराम महाविद्यालय येथे ‘इश्कवाला लव्ह’ या मराठी चित्रपटातील कलाकार आदिनाथ कोठारे, अभिनेत्री सुलग्ना पाणिग्रही आणि दिग्दर्शक रेणू देसाई यांनी विद्यार्थ्यांशी मनसोक्त गप्पा मारल्या.अभिनेते आदिनाथ कोठारे यांनी महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधून प्रेमाबद्दल त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यास महाविद्यालयीन तरुणांनी तितक्याच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. त्याला अभिनेत्री सुलग्ना पाणिग्रही यांनी साथ दिली. या प्रेमासारख्या नाजूक विषयातून प्राध्यापकही सुटले नाहीत. आदिनाथने त्यांनाही मन मोकळे करण्यास सांगितले. भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेज येथे उपप्राचार्य डॉ. एम. एम. भाटिया यांनी या टीमचे स्वागत केले. याप्रसंगी डॉ. डी. ए. भागवत, सांस्कृतिक विभागप्रमुख आर. आर. जरग उपस्थित होते. मोसीना मोमीन व इंद्रजा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर शालिनी पाटील यांनी आभार मानले. राजाराम महाविद्यालय येथे प्राचार्य डॉ. वसंत हेळवी यांनी स्वागत केले. जिव्हाळ्याचा चित्रपट ‘इश्कवाला लव्ह’ या चित्रपटातील कथा महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या जिव्हाळ्याशी निगडित आहे. या चित्रपटातून प्रेम, मनोरंजन याची माहिती मिळतेच; शिवाय प्रत्येक तरुण-तरुणींना ही तर आपलीच कथा आहे, असे वाटते. त्याचबरोबर समाजातील वास्तवही मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. - अभिनेता आदिनाथ कोठारे लग्न नको....हा माझा मराठीतील पहिला चित्रपट आहे. घरातील सर्व व्यक्ती एकत्र बसूनही या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात. अनेक तरुण-तरुणींना फक्त प्रेम करायचे आहे. मात्र त्यांना लग्न करायचे नाही. त्यांच्या मते लग्नानंतर प्रेम संपते, अशी काहीशी भावना निर्माण झाली आहे. त्यांच्यावर प्रकाशझोत टाकणारा हा चित्रपट आहे. १० आॅक्टोबरला हा चित्रपट सर्वत्र रिलीज होणार असून, तुम्ही चित्रपटगृहात जाऊन नक्की हा चित्रपट पाहावा.- अभिनेत्री सुलग्ना पाणिग्रही आता लग्न करणार का?पूर्वी घरामध्ये ‘मुलगा किंवा मुलगी लव्ह मॅरेज करणार का?’ या विषयावर चर्चा होत होती. मात्र, आता ‘मुलगा किंवा मुलगी लग्न करणार आहे का?’ या विषयावर चर्चा होऊ लागली आहे. समाजात विविध प्रश्न आहेत़ यामध्ये विवाह आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ या बाबीकडे आकर्षित होणाऱ्या तरुणाईतून निर्माण होणारे प्रश्न, यामुळे तरुणाईची होणारी घुसमट, आदी बाबींकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. - दिग्दर्शक रेणू देसाई