क्षीरसागर यांच्याकडून ‘कस्तुरी’ला अगोदर मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:20 IST2021-05-30T04:20:15+5:302021-05-30T04:20:15+5:30

कोल्हापूर : माऊंट एव्हरेस्ट मोहिमेवर असलेली कोल्हापूरची गिर्यारोहक कस्तुरी सावेकर हिला मोहिमेकरीता सगळ्यात अगोदर ऋतुराज क्षीरसागर यांच्या वाढदिवसाचे औचित्य ...

First aid to Kasturi from Kshirsagar | क्षीरसागर यांच्याकडून ‘कस्तुरी’ला अगोदर मदत

क्षीरसागर यांच्याकडून ‘कस्तुरी’ला अगोदर मदत

कोल्हापूर : माऊंट एव्हरेस्ट मोहिमेवर असलेली कोल्हापूरची गिर्यारोहक कस्तुरी सावेकर हिला मोहिमेकरीता सगळ्यात अगोदर ऋतुराज क्षीरसागर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मार्चमध्येच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पन्नास हजारांची मदत दिली. हा मदतीचा धनादेश तिचे वडील दीपक सावेकर यांच्याकडे सुपूर्द केला.

कस्तुरीला या मोहिमेकरीता लाखो रुपयांचा खर्च येत आहे. तिला अर्थिक पाठबळ मिळावे, याकरिता क्षीरसागर यांनी २२ मार्च २०२१ला हा धनादेश देऊन कस्तुरीच्या मोहिमेला प्रथम पाठबळ दिले.

फोटो : २९०५२०२१-कोल-राजेश क्षीरसागर

आेळी : कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर हिच्या एव्हरेस्ट मोहिमेकरिता मदत म्हणून राजेश क्षीरसागर यांनी तिला पन्नास हजार रुपये दिले. तिचे वडील दीपक सावेकर यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला.

Web Title: First aid to Kasturi from Kshirsagar