शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

वडगावात शेती गोडाऊनला आग, लाखो रूपयांचे नुकसान: आगीचे कारण अस्पष्ट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 11:39 IST

Fire Kolhapur : पेठवडगाव येथील पालिका चौकातील किसान शेती भांडार या दुकानाच्या गोडाऊनला आग लागून लाखो रूपयांची खते, रासायनिक औषधे खाक झाले. ही आग पहाटे पाचच्या सुमारास लागली होती. दोन तासांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आली.वेळीच आग आटोक्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

ठळक मुद्देवडगावात शेती गोडाऊनला आगलाखो रूपयांचे नुकसान: आगीचे कारण अस्पष्ट 

पेठवडगाव : येथील पालिका चौकातील किसान शेती भांडार या दुकानाच्या गोडाऊनला आग लागून लाखो रूपयांची खते, रासायनिक औषधे खाक झाले. ही आग पहाटे पाचच्या सुमारास लागली होती. दोन तासांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आली.वेळीच आग आटोक्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला.येथील पालिकेच्या इमारतीमध्ये असणाऱ्या दुकान गाळे आहेत. यामध्ये आठ नंबरच्या दुकान कृष्णात घारसे यांचे  किसान शेती भांडार असे बियाणे खते विक्रीचे दुकान आहे. या दुकाना शेजारीच घारसे यांचे   गोडाऊन आहे.दरम्यान आज आज पहाटे अचानक आग लागली.आगीने रौद्र रूप धारण केले होते.बॅकेच्या एटीएमच्या सुरक्षारक्षकाला आग लागल्याचे लक्षात आले.त्याने तातडीने संपर्क साधून माहिती दिली.तसेच अग्निशमन दलाने ही धाव घेतली.खाजगी टँकरने पाणी घटनास्थळ आले.अखेर अथक प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.तसेच पालिकेच्या जेसीपी व दोन टॅक्टरच्या मदतीने गोडाऊन मधील जळीत व चांगले साहित्य बाहेर काढण्यात आले.  नगराध्यक्ष मोहनलाल माळी,अभिनंदन सालपे,सुधाकर पिसे आदींसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.अग्निशमन दलाचे प्रशांत आवळे, गणेश नायकवडी फायरमॅन अंकुश कदम केतन धनवडे सुशांत आवळे ,महेश पाटील, अजित पाटील यांनी मदत कार्यात सहकार्य केले.यामध्ये मोठ्या प्रमाणात खते बियाणे रासायनिक औषधे आदींचे नुकसान झाले.तर तर काही साहित्य वाचविण्यात यश आले.

टॅग्स :fireआगkolhapurकोल्हापूर