शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

सुपारी देणाऱ्या धर्ममार्तंडांनाही शोधा

By admin | Updated: November 25, 2015 00:54 IST

विराट निर्धार परिषदेत आवाहन : ‘सनातन’वर कारवाई करा, तपासाची कागदपत्रे उच्च न्यायालयात देण्याचा ठराव

कोल्हापूर : धर्ममार्तंडांच्या शक्तीला विरोध करणारे दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांची हत्या करणारे कोण आहेत, हे पोलिसांनी शोधून काढले आहे; पण त्यांना सुपारी देणाऱ्यांचाही पोलिसांनी शोध घ्यावा, असे आवाहन केले. सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ आणि जातिमुक्त आंदोलनाच्या वतीने या विराट निर्धार परिषदेचे आयोजन मंगळवारी दुपारी येथील दसरा चौकात करण्यात आले होते. या निर्धार परिषदेत डॉ. नरेंद्र दाभोलकर, अ‍ॅड. गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम कलबुर्गी यांच्या हत्याप्रकरणी सुरू असलेला तपास संथगतीने व निर्जीव पद्धतीने सुरू असून त्याचा निषेध करून; या प्रकरणी पोलीस यंत्रणेकडे तपासकामात नोंदणीकृत असणारी कागदपत्रे मुंबई उच्च न्यायालयाकडे सादर करावीत, ‘सनातन’ या संघटनेच्या कामांची व त्यांच्या नेत्यांची कसून चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कारवाई व्हावी, असे तीन ठराव यावेळी केले. भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील उपस्थित होते. प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, ही परिषद संघर्षाला सलाम होती. धर्मांध शक्तीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली राज्यघटना मान्यच नाही; त्यामुळे राज्यघटनेलाच धोका निर्माण झाला आहे. सद्य:स्थितीत संसदीय लोकशाहीला आव्हान करणारी धर्ममार्तंडांची सत्ता निर्माण झाली आहे. हे आव्हान परतवण्यासाठी आपण ताकदीने लढा उभारण्याची गरज आहे. पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी यांच्या फक्त विचाराचे अपुरे राहिलेले जीवनकार्य पुढे न्या. डॉ. प्रकाश आंबेडकर म्हणाले, सध्या सत्ताधाऱ्यांचा पोलिसांवर दबाव येत आहे. या नेत्यांच्या हत्येतील पुरावे मिळाले आहेत. गोळ्या मारणारा हाती लागला; पण सुपारी देणाऱ्याचाही शोध घ्यावा. जर सत्ताधारी आणि पोलीस संशयितांना संरक्षण देणार असतील तर आम्हीही त्याविरोधात संघर्ष करू. डॉ. भारत पाटणकर म्हणाले, सनातनवाद्यांविरोधात आपणालाही संघर्ष करावा लागत आहे. ही ऐतिहासिक लढाई आहे. येथून पुढे आमच्या चळवळीतील नेत्यालाच नव्हे कार्यकर्त्यालाही बोट लावण्याचे धाडस या धर्मांध शक्ती करणार नाहीत याची खात्री बाळगा. कॉ. भालचंद्र कानगो यांनीही विचार मांडले. कॉ. चंद्रकांत यादव यांनी स्वागत केले. कॉ. दिलीप पवार यांनी प्रास्ताविक केले; तर अतुल दिघे यांनी सूत्रसंचालन केले. धनाजी गुरव, संग्राम सावंत, वलीअली कादरी, किशोर जाधव, मिलिंद रानडे, महेंद्रसिंग, गेल आॅम्व्हेट, प्रतिमा परदेशी, भीमराव बनसोड यांनी धर्मांध जातीय शक्तींना रोखण्याचे आव्हान केले. यावेळी किशोर ढमाले यांनी ठरावाचे वाचन केले. यावेळी उमा पानसरे, मेघा पानसरे, अशोक ढवळी, नामदेवराव गावडे, अ‍ॅड. बन्सी सातपुते, रघुनाथ कांबळे, आदी उपस्थित होते.