शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबातील पहिल्या साक्षर विद्यार्थ्याला आर्थिक पाठबळ

By admin | Updated: April 8, 2015 23:59 IST

विद्यापीठाचा उपक्रम : आरती पाटणकर पारितोषिकाने प्रारंभ

संतोष मिठारी-कोल्हापूर -कुटुंबाच्या आर्थिक, तसेच अन्य परिस्थितीमुळे काही पिढ्यांना शिक्षणच मिळालेले नसते. अशा कुटुंबांतून जिद्दीने पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने घेतला आहे. संबंधित विद्यार्थ्यांना देणगीदारांनी दिलेल्या निधीतून पारितोषिकांच्या स्वरूपात मदत केली जाणार आहे.‘ग्रामीण विद्यापीठ’ अशी ओळख असलेल्या शिवाजी विद्यापीठात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील दुर्गम खेड्या-पाड्यांतून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. कुटुंबांत काही पिढ्यांना शिक्षणाची ओळख नसतानाही ते साक्षर होतात; शिवाय महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या पूर्ततेसाठी विद्यापीठात अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रवेशित होतात. प्रतिकुल परिस्थितीतही शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. त्यांना पुस्तके, प्रवेश शुल्कासाठी पैशांची जुळवाजुळव करताना अनेकदा कसरत करावी लागते. हे लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांना पारितोषिकांच्या माध्यमातून यावर्षीपासून विद्यापीठ आर्थिक मदत करणार आहे. या उपक्रमाची सुरुवात संगणक अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे अंतिम वर्ष (बी. ई. फायनल इन कॉम्प्युटर सायन्स) सर्वाधिक गुणांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनीला आरती पाटणकर परितोषिक देऊन होणार आहे. अर्जात यंदा बदलपहिल्या पिढीतील साक्षर विद्यार्थी, विद्यार्थिनींची माहिती संकलित करण्यासाठी यावर्षीपासून विद्यापीठाच्या सर्वच प्रवेश अर्जात बदल केला जाणार आहे. अर्जात पहिल्या पिढीतील अथवा दुसऱ्या पिढीतील साक्षर आहात का? असे दोन रकाने असणार आहेत. त्याद्वारे माहिती संकलित करून या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.वर्षाकाठी पावणेतीन लाखांचे वितरणदेशाच्या कानाकोपऱ्यांतील २०२ व्यक्ती, संस्था असे देणगीदार दरवर्षी शिवाजी विद्यापीठातील ३५० गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला पारितोषिकांच्या माध्यमातून बळ देत आहेत. या पारितोषिकांच्या माध्यमातून वर्षाकाठी पावणेतीन लाखांच्या रकमेचे वितरण केले जाते. गेल्या ४९ वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.काही व्यक्ती, संस्था पारितोषिकांसाठी विद्यापीठाला देणगी देतात. अशा देणगीदारांना या नव्या उपक्रमात सहभागी होण्याची विनंती केली जाणार आहे. त्यानुसार त्याची सुरुवात आरती पाटणकर पारितोषिकाने झाली आहे. - डॉ. अशोक भोईटे, प्रभारी कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ