शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
8
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
9
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
10
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
13
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
14
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
15
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
17
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
18
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
19
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
20
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

४० कोटी भरा, अन्यथा महापालिका बरखास्त करू!

By admin | Updated: May 12, 2015 23:40 IST

सांगलीतील घनकचरा प्रश्न : हरित न्यायालयाचे आदेश; ३ जुलैपर्यंत मुदत

सांगली : घनकचराप्रश्नी महापालिकेने ३ जुलैपर्यंत ४० कोटी रुपये विभागीय आयुक्तांकडे जमा करावेत, अन्यथा महापालिका बरखास्त करू, असा सज्जड दम मंगळवारी हरित न्यायालयाने भरला. त्यामुळे महापालिकेसमोरील अडचणीत नव्याने वाढ झाली आहे. उर्वरित रकमेसाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशाने घनकचरा प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी तीनजणांच्या समितीला आयुक्तांच्या सहीने पत्रे पाठविण्यात आली आहेत.महापालिकेने पंधरा वर्षांत घनकचरा प्रकल्प राबविला नसल्याने जिल्हा सुधार समितीने हरित न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने महापालिकेला फटकारत, ६० कोटी रुपये विभागीय आयुक्तांकडे जमा करण्याचे आदेश दिले. त्यापैकी २० कोटी रुपये महापालिकेने जमा केले आहेत. कोल्हापूर महापालिकेच्या धर्तीवर घनकचरा प्रकल्पाचा आराखडाही तयार केला होता. गत सुनावणीवेळी न्यायालयाने हा आराखडा फेटाळून लावला. सुधारित आराखडा तयार करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट आॅफ कॉमर्स, मुंबईतील आयआयटी व सांगलीतील वालचंद महाविद्यालयासह या विषयातील तज्ज्ञांची समिती नियुक्त केली आहे. दरम्यान, सुधार समितीच्या याचिकेवर मंगळवारी हरित न्यायालयात सुनावणी झाली. महापालिकेला फटकारत, गत सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश का जोडला नाही, अशी विचारणा केली. त्यानंतर न्यायालयाने उर्वरित ४० कोटी रुपये तत्काळ भरण्याचे निर्देश दिले, पण पालिकेच्या वकिलांनी आर्थिक स्थितीची अडचण निदर्शनास आणून दिली. न्यायालयाने पुढील सुनावणीवेळी म्हणजे ३ जुलैपूर्वी ४० कोटींची रक्कम विभागीय आयुक्तांकडे जमा करण्याचे आदेश दिले. रक्कम जमा न केल्यास बरखास्तीचा पर्याय खुला असल्याचा दमही भरल्याचे समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे यांनी सांगितले. आदेशाबाबत महापालिका अनभिज्ञहरित न्यायालयाच्या सुनावणीत ४० कोटी भरण्याबाबतचे आदेश झाल्याबद्दल महापालिका अनभिज्ञ आहे. आयुक्त अजिज कारचे यांच्याशी संपर्क साधला असता, महापालिकेच्या वकिलांकडून माहिती घेऊ, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. सध्या महापालिकेने २० कोटी रुपये विभागीय आयुक्तांकडे जमा केले आहेत. समिती नियुक्तीच्या आदेशाची पत्र प्राप्त झाली असून, समितीतील तीन संस्थांना प्रकल्प आराखडा तयार करण्यासंदर्भात पत्र पाठविल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीकडे नगरसेवकांची पाठहरित न्यायालयाचा आदेश, सर्वोच्च न्यायालयातील अपील, वकिलांच्या शुल्कावर झालेला खर्च या साऱ्या बाबींवर महापौर विवेक कांबळे यांनी आयुक्त व नगरसेवकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत बहुतांश नगरसेवकांनी पाठ फिरवली होती.