क्रिक्रेट खेळण्यावरून मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:26 IST2021-04-27T04:26:26+5:302021-04-27T04:26:26+5:30

पोलिसातून मिळालेली माहिती अशी, पातवडे प्राथमिक शाळेच्या मैदानावर रणजित शिंदे व संग्राम पाथरे हे दोघे टीम लीडर क्रिकेट खेळत ...

Fights over playing cricket | क्रिक्रेट खेळण्यावरून मारामारी

क्रिक्रेट खेळण्यावरून मारामारी

पोलिसातून मिळालेली माहिती अशी, पातवडे प्राथमिक शाळेच्या मैदानावर रणजित शिंदे व संग्राम पाथरे हे दोघे टीम लीडर क्रिकेट खेळत होते. क्रिकेट खेळत असताना दोन्ही गटांत क्रिकेट खेळण्यावरून मारामारी झाली. यामध्ये सुरेखा पाथरे यांचा मुलगा

संग्राम याला रणजित शिंदे याने मारहाण करून घराचा दरवाजा मोडून घरावरील कौले फोडून पाच हजार रुपयांचे नुकसान केले, तर शरद गावडे याला संग्राम पाथरे याने क्रिक्रेट खेळण्याच्या स्टंपने मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी दोन्हींकडील रणजित शिंदे, विजय शिंदे, आनंदा गावडे, सुरज गावडे, विजय शिंदे, संग्राम पाथरे, छाया आयत, अक्षय साबळे, प्रकाश आयत, प्रीतेश शिंदे रा. पातवडे, नयन पाटील पेरीड, नितीन लवते, सचिन जाधव, नागेश महाजन येलुर पैकी जाधववाडी यांचेवर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Fights over playing cricket