फायटर्स स्पोर्टस्‌ क्लब उपांत्य फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:12 IST2021-02-05T07:12:57+5:302021-02-05T07:12:57+5:30

कोल्हापूर : जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित दीपक शिंदे (अ) गट क्रिकेट स्पर्धेत फायटर्स स्पोर्टस्‌ क्लबने आण्णा मोगणे सहारा स्पोर्टस्‌ ...

Fighters Sports‌ Club in the semifinals | फायटर्स स्पोर्टस्‌ क्लब उपांत्य फेरीत

फायटर्स स्पोर्टस्‌ क्लब उपांत्य फेरीत

कोल्हापूर : जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित दीपक शिंदे (अ) गट क्रिकेट स्पर्धेत फायटर्स स्पोर्टस्‌ क्लबने आण्णा मोगणे सहारा स्पोर्टस्‌ अकॅडमी (ब) चा ६८ धावांनी पराभव करीत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

कागल येथे सोमवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना फायटर्सने ४० षटकांत सर्वबाद १९१ धावा केल्या. यात मंथन पाटीलने नाबाद ३२, शुभम कानिटकरने २९, सम्राट घोरपडेने २३, आकाश गाडेकरने २२, आदित्य शिंदेने १९, तर उत्तम तनंगे याने १४ धावा केल्या. मोगणे सहाराकडून श्रेयस चव्हाण व सूरज जाधव यांनी प्रत्येकी तीन, रोहन तोरस्कर, वैभव पाटील व रचित चौगुले यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

उत्तरादाखल खेळताना मोगणे सहारा संघाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांच्या संघ २५.१ षटकांत सर्वबाद १२३ धावांत गुंडाळला. यात अभिनंदन गायकवाडने २४, नील कदमने २१, सूरज जाधवने १८ धावा करीत झुंज दिली. मात्र, फायटर्सच्या निखिल कदम व अथर्व शिंदे यांनी भेदक गोलंदाजी करीत प्रत्येकी तीन बळी घेतले. तसेच मंथन पाटील, अर्षद पठाण यांनी प्रत्येकी दोन बळी घेत विजयावर शिक्कामोर्तब करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Web Title: Fighters Sports‌ Club in the semifinals