शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पाचगावात शेजाऱ्याच्या मारहाणीत युवक जखमी

By admin | Updated: August 22, 2015 00:54 IST

‘कपडे घालून या’ असे सांगितल्याच्या रागातून काठीने हल्ला

कोल्हापूर : ‘कपडे घालून या’ असे सांगितल्याच्या रागातून पाचगाव (ता. करवीर) येथील नीलेश दगडू टिपुगडे (वय २३) यांच्यावर शेजारी राहणाऱ्या दत्तात्रय सोनवणे (३८) याने काठीने हल्ला करीत जखमी केले. जखमी नीलेश यास उपचारासाठी नातेवाइकांनी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. पाचगाव येथील पाचगाव विद्यामंदिरजवळ नीलेश यांचे केश कर्तनालयाचे दुकान आहे. त्याच्या शेजारीच दत्तात्रय सोनवणे याचेही चिकन व सायकल दुकान आहे. शुक्रवारी दुपारी दत्तात्रय हा बर्मुडा चड्डी व बनियानवर नीलेशच्या दुकानात दारू पिऊ न आला. यावेळी नीलेशने त्यास गिऱ्हाईक आहे, तू कपडे घालून ये, असे सांगितले. कपडे घालून ये असे सांगितल्याच्या रागातून दत्तात्रयने पुन्हा बाहेर जाऊन काठी आणली. यावेळी झालेल्या वादावादीत दत्तात्रयने नीलेश यास काठीने डोक्यात प्रहार करीत जखमी केले. डोक्यास मार लागल्याने नीलेश डोक्यास हात लावून दुकानाबाहेर आला. यावेळी तेथून दत्तात्रय बाहेर निघून गेला. जखमी नीलेश यास त्याच्या नातेवाईक व मित्रांनी पाचच्या सुमारास सीपीआर रुग्णालयात दाखल केले.