शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

स्त्रीवाद, आदिवासी मूल्ये हीच नर्मदा बचाव आंदोलनाची शक्ती- : शिल्पा बल्लाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 01:00 IST

शाश्वत विकासाच्या नावाखाली तुम्ही नद्यांचे पाणी अडवून ठेवाल तर नद्या स्वत: आपला मार्ग शोधतील. त्यावेळी होणारा विध्वंस आणि झालेली अपरिमित हानी न भरून निघणारी असते, हे यंदाच्या महापुरामुळे लक्षात आले असेल.

ठळक मुद्देअजूनही या लोकांचा आपलं घर, दार, शेतीवाडी आणि जगण्याच्या मूलभूत हक्कांसाठी व पुनर्वसनासाठी लढा सुरू आहे. तो मागण्या मान्य होईपर्यंत असाच चालू राहणार आहे.
इंदुमती गणेश।नर्मदा नदीवर साकारलेल्या सरदार सरोवर धरणामुळे महाराष्ट्र, गुजरात, आणि मध्य प्रदेशातील ५० हजारांहून अधिक कुटुंबांना विस्थापित व्हावे लागले. आजतागायत न झालेले पुनर्वसन, शेतीवाडी, घरं या मूलभूत हक्कांसाठी हाती तीर-कमान असलेल्या आदिवासींकडून सुरू असलेल्या नर्मदा बचाव आंदोलनाला ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत... या पार्श्वभूमीवर निर्मात्या शिल्पा बल्लाळ यांनी नुकत्याच ‘लकीर के इस तरफ’ या माहितीपटाची निर्मिती केली आहे. यानिमित्ताने त्यांची घेतलेली चर्चेतील मुलाखत...प्रश्न : सरदार सरोवर धरण परिसरातील विस्थापितांचे प्रश्न काय आहेत ?उत्तर : नर्मदा नदीवर धरण बांधताना बाधित होणाऱ्या कुटुंबांना विश्वासातच घेतले गेले नाही. ५० हजार कुटुंबांपैकी केवळ ३५ हजार कुटुंबे शासनाच्या पुनर्वसन यादीत आहेत. १६ हजार कुटुंबांना अचानक सांगण्यात आले की, तुमचे पुनर्वसन होणार नाही. धरणात किती पाणीसाठा होतो, हे पाहण्यासाठी यंदा पावसाळ्यात धरणातून पाणीच सोडण्यात आलेले नाही. केवळ साठा वाढविला जात आहे. त्यामुळे गावंच काय, नवीन वसाहतीही पाण्यात बुडाल्या आहेत. वीजनिर्मिती शून्य, त्यांनी वायदा केल्याप्रमाणे कच्छपर्यंत तर पाणीच पोहोचले नाही.प्रश्न : ३५ वर्षे लढा सुरू राहण्यामागचे रहस्य काय?उत्तर : हे खरं आहे की आंदोलन दाबलं जातंय, त्यांच्या हक्कांची पायमल्ली केली जात आहे, सगळ्या बाजूंनी गळचेपी आणि त्यांना कोंडीत पकडले जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना आता असं वाटतंय की नर्मदा बचाव आंदोलन आता संपलं आहे; पण आदिवासींच्या हातात हत्यार असले तरी ते खूप शांतताप्रिय आणि अहिंसावादी आहेत. या आंदोलनाचा लोगोही ‘जमिनीत रोवलेला बाण’ असा आहे. या आदिवासींची मूल्यं, मेधातार्इंनी सांभाळलेली धुरा आणि स्त्रीवादाचा प्रभाव हे मला या आंदोलनाच्या यशाचे रहस्य वाटते. अजूनही या लोकांचा आपलं घर, दार, शेतीवाडी आणि जगण्याच्या मूलभूत हक्कांसाठी व पुनर्वसनासाठी लढा सुरू आहे. तो मागण्या मान्य होईपर्यंत असाच चालू राहणार आहे.*नर्मदा नदीवर १३५ मध्यम, ३० मोठी व तीन हजार लहान धरणं आहेत.*सर्वांत मोठ्या सरदार सरोवर धरणाची उंची : १३८.६८ मीटर*आलेला खर्च : ६० हजार कोटी रुपये*बुडालेली गावं : महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातील २४५ गावं*बुडीत जमीन : ३७ हजार ६९० हेक्टर*विस्थापित नागरिक : ५० हजार कुटुंबे व अडीच लाखांहून अधिक नागरिक*पुनर्वसित झालेली कुटुंबे : ११ हजार
टॅग्स :riverनदीGujaratगुजरातMaharashtraमहाराष्ट्र