शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-गुप्तधनासाठी अघोरी प्रकार: वडिलांना सापडला सोन्याचा जिन्नस अन् ४५ वर्षे डोक्यात खूळ

By उद्धव गोडसे | Updated: July 4, 2024 17:16 IST

कौलवमधील शरद मानेला पछाडले : मांत्रिकांवर हजारो रुपये उधळले 

उद्धव गोडसे कोल्हापूर : कौलवमध्ये (ता. राधानगरी) ४५ वर्षांपूर्वी घर बांधताना धर्मा माने यांना खड्ड्यात एक सोन्याचा जिन्नस सापडला होता. तीच घटना मनात ठेवून गेली ३० वर्षे शरद धर्मा माने (वय ५२, रा. कौलव) हा गुप्तधन मिळविण्याच्या मागे लागला होता. त्यासाठी त्याने अनेक मांत्रिकांवर हजारो रुपये उधळले. गुप्तधन सापडले नाहीच शिवाय संसाराची राख झाली. आता तर गुप्तधनाच्या लालसेपोटी त्याला पोलिस कोठडीची हवा खावी लागत आहे.राधानगरी तालुक्यातील सधन गावांपैकी एक असलेल्या कौलवची अर्थव्यवस्था शेती आणि दूध व्यवसायावर अवलंबून आहे. याच गावातील धर्मा माने यांनी ४५ वर्षांपूर्वी वडिलोपार्जित जागेत छप्परवजा घर उतरवून त्या ठिकाणी पक्के घर बांधण्यास सुरुवात केली. त्यावेळी खोदलेल्या खड्ड्यात धर्मा माने यांना एक सोन्याचा जिन्नस सापडला होता. तेव्हा त्यांचा मुलगा शरद हा सात वर्षांचा होता. त्यानंतर घरात गुप्तधन असल्याच्या गोष्टी अनेकदा त्याच्या कानावर पडल्या. लहान वयात डोक्यात बसलेले गुप्तधनाचे खूळ पुढे कायम राहिले. गेल्या ३० वर्षांत त्याला गुप्तधनाच्या लालसेने पछाडले. तीन जापत्याच्या घरात देवघरात गुप्तधन असल्याचा त्याचा समज होता. त्यामुळे तो देवघरात सहसा कोणाला जाऊ देत नव्हता.गुप्तधन मिळवून देणाऱ्या मांत्रिकांच्या शोधातील शरद माने याला गावातील एकाने पैशांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली. त्याच्या संपर्कातून शरद काही मांत्रिकांपर्यंत पोहोचला. गेल्या चार-पाच वर्षांत त्याने अनेक मांत्रिकांना घरी बोलावून पूजाअर्चा, विधी केले. कराडमधील मांत्रिकांची माहिती मिळताच त्याने त्यांच्याशी संपर्क साधून गुप्तधन मिळवून देण्याची विनंती केली. त्यासाठी ५० ते ६० हजार रुपये देण्याची तयारी दाखवली. त्यानुसार १५ दिवसांपूर्वीच त्याने देवघरात खड्डा खोदून ठेवला. मंगळवारी शरद माने याच्यासह मांत्रिकाच्या टोळीचे कृत्य उघडकीस आले आणि कौलवसह परिसरात खळबळ उडाली.पती-पत्नीमध्ये वादअटकेतील शरद माने याचे गुप्तधनाचे खूळ त्याच्या पत्नीला पटत नव्हते. यावरून दोघांमध्ये वारंवार वादाचे खटके उडत होते. १५ दिवसांपूर्वी त्याने घरात खड्डा खोदल्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली होती. मात्र, गुप्तधनाचे खूळ माने याच्या डोक्यातून गेले नाही.

मांत्रिकांच्या टोळ्या सक्रियपैशाचा पाऊस पाडून देतो, दुप्पट रक्कम करून देतो, गुप्तधन मिळवून देतो, पुत्र प्राप्तीसाठी औषध देतो, असे सांगून फसवणूक करणाऱ्या मांत्रिकांच्या टोळ्या सक्रिय आहेत. या टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांना विशेष मोहीम राबवावी लागणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस