मुलापाठोपाठ वडिलांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:24 IST2021-05-23T04:24:07+5:302021-05-23T04:24:07+5:30

हरळी साखर कारखान्यात सुलगाव येथील वसंतराव पांडुरंग देसाई (वय ६२) हे एचआर मॅनेजर म्हणून काम करीत होते. ते ...

Father dies after childbirth | मुलापाठोपाठ वडिलांचा मृत्यू

मुलापाठोपाठ वडिलांचा मृत्यू

हरळी साखर कारखान्यात सुलगाव येथील वसंतराव पांडुरंग देसाई (वय ६२) हे एचआर मॅनेजर म्हणून काम करीत होते. ते कारखान्याच्या कॉलनीत वडील, पत्नी, मुलासोबत राहात होते. वसंतराव देसाई यांना त्रास होऊ लागल्याने ते स्वतः उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज येथे उपचार घेत होते. त्याचदरम्यान वडील पांडुरंग तुकाराम देसाई (वय ९२) हे सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यांच्यावरही गडहिंग्लज येथे उपचार सुरू होते. वसंतराव यांचा गुरुवारी मृत्यू झाला. ही माहिती वडील पांडुरंग देसाई यांना समजताच त्यांनीही शुक्रवारी आपला प्राण सोडला.

वसंतराव देसाई यांच्या पश्चात पत्नी व मुलगा आहे.

फोटो २२ वसंतराव देसाई. २२ पांडूरंग देसाई.

Web Title: Father dies after childbirth