Pune Bridge Collapse: 'फादर्स डे'लाच कोल्हापुरातील उजळाईवाडीच्या पिता-पुत्राचा अंत, पत्नी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:37 IST2025-06-16T12:36:54+5:302025-06-16T12:37:18+5:30

Indrayani Kundmala Bridge Collapse:

Father and son from Ujlaiwadi in Kolhapur die on Father's Day in bridge collapse accident on Indrayani river in Pune | Pune Bridge Collapse: 'फादर्स डे'लाच कोल्हापुरातील उजळाईवाडीच्या पिता-पुत्राचा अंत, पत्नी गंभीर जखमी

Pune Bridge Collapse: 'फादर्स डे'लाच कोल्हापुरातील उजळाईवाडीच्या पिता-पुत्राचा अंत, पत्नी गंभीर जखमी

उचगाव (जि. कोल्हापूर) : पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या अपघातात उजळाईवाडी (ता. करवीर) येथील रोहित सुधीर माने (वय ३५) व त्याचा चार वर्षांचा मुलगा विहान रोहित माने या दोघांचा 'फादर्स डे'लाच दुर्दैवी मृत्यू झाला.

या अपघातात रोहित याची पत्नी शमिका या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच रोहितचे आई,वडील तातडीने पुण्याकडे रवाना झाले.

रोहित हे नावाजलेले क्रिकेटपटू होते. शालेय स्तरावरील अनेक स्पर्धा त्यांनी गजविल्या होत्या. सध्या ते पुण्यात एका आयटी कंपनीत नोकरीस असल्याने पत्नी शमिका व मुलगा विहान यांच्या समवेत चिंचवड येथे स्थायिक झाले होते. अतिशय हुशार, होतकरू म्हणून रोहित सर्वांना परिचित होते.

रोहित यांचे उजळाईवाडीतील सरकार चौक येथे घर असून त्यांचे वडील सुधीर हे एका मेडिकल कंपनीत कार्यरत आहेत. त्यांची आई नर्मदा माने यांचा उजळाईवाडीतील सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असतो.

Web Title: Father and son from Ujlaiwadi in Kolhapur die on Father's Day in bridge collapse accident on Indrayani river in Pune